चाळीसगाव : गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त

चाळीसगाव पोलीस स्टेशनला चार जणांवर गुन्हा
चाळीसगाव : गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या ओझर शिवारातील अवैध रीत्या सुरु असलेली गावठी दारू भट्टीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी दि 25 रोजी सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण एकुण 84 हजार150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचा जागेवर नाष्ट केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझर शिवारात शेतात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर दि 25 रोजी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि सचिन कापडने, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील,अभिमान पाटील, पंढरीनाथपवार, प्रविण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतिष राजपूत, भगवान माळी यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास छापा मारून ठिकाणावरुन 200 लिटर उकळते रसायण, 2625 लिटर कच्चे रसायन, 770 लिटर गावठी दारू असा एकुण 84,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com