चाळीसगाव : संचारबंदीसाठी पोलीस रस्त्यावर

विनाकारण घराबाहेर पडणार्‍यावर कडक कारवाई-पोलीस निरिक्षक
चाळीसगाव : संचारबंदीसाठी पोलीस रस्त्यावर

चाळीसगाव | प्रतिनिधी- Chalisgaon

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा आज रात्री आठ वाजेपासून संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यासाठी चाळीसगाव येथे आज सायंकाळी सहा वाजेपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले असून शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. तसेच तालुक्यातील सिमांवर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यासाठी खासकरुन दगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. रात्री आठ नतंर विनाकारण बाहेर फिरणार्‍यावर कडक कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. शहरातील सिग्नल चौकात चाळीसगाव पोलिसांसह दगा नियंत्रण पथकातील जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्यामुळे छावणी स्वरुप प्राप्त झाले होते. तसेच विना मास्क फिरणार्‍यांची विचारपूस केली जात असून अनेका ना पोलिसांची सोम्य प्रकारचा प्रसाद देखील वाटप केला.

संचारबंदीच्या कालवंधीत विनाकारण बाहेर पडणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरात थांबवे. विनाकारण घराच्या बाहेर पडणार्‍यांवर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करु-

विजयकुमार ठाकुरवाड,पोलिस निरिक्षक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com