चाळीसगाव पोलिसांकडून ५० ठिकाण आरएफआडी प्रणाली कार्यान्वीत

चोर्‍या, घरफोडीला आळा घालण्यासाठी प्रणालीचा प्रभावी उपयोग
चाळीसगाव पोलिसांकडून ५० ठिकाण आरएफआडी प्रणाली कार्यान्वीत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन (Chalisgaon City Police Station) हद्दीत घडणार्‍या चोर्‍या, घरफोडीसारख्या घडणार्‍या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी (Police officer) व कर्मचारी यांची प्रभावी गस्त होण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे (Superintendent of Police Dr. Pravin Munde) यांच्या कल्पकतेने व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्ववेन्शी आयडिंटीफिकेशन) यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

चाळीसगाव पोलिसांकडून ५० ठिकाण आरएफआडी प्रणाली कार्यान्वीत
Video कन्नड घाटात दरड कोसळली ; वाहतुक ठप्प

या यंत्रणेचे उदघाटन शहर पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे उपस्थित होते. सदर यंत्रणेद्वारे संपूर्ण चाळीसगाव शहरातील कानाकोपर्‍यातील ५० ठिकाणी आरएफआयडीचे सेन्सर टॅग लावण्यात आले आहे.

चाळीसगाव पोलिसांकडून ५० ठिकाण आरएफआडी प्रणाली कार्यान्वीत
12 तासांच्या आत चोरटे गजाआड ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी

रात्री तसेच दिवसा गस्तीदरम्यान ठाणे अंमलदार तसेच अधिकारी हे सदर ठिकाणी भेट देणार असून सदर भेटीदरम्यान सदर ठिकाणी सेन्टर टॅगला कितीवेळा व किती वाजता भेट दिली याची अचूक माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील संगणकावरील पेट्रोल मॅनेजमेंट डाटा येथे ऑनलाईन पोलीस स्टेशनला संकलीत होईल सदर यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी प्रयत्न केले

चाळीसगाव पोलिसांकडून ५० ठिकाण आरएफआडी प्रणाली कार्यान्वीत
कार अपघातात कन्नडचे तीन तरुण ठार, पाच जखमी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com