चाळीसगाव : सोमवार पासून काद्याचे लिलाव पूर्ववत

२७ ऑक्टोबरपासून थांबवली हाोती कांदा खरेदी
चाळीसगाव : सोमवार पासून काद्याचे लिलाव पूर्ववत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात शुक्रवार पासून हे लिलाव सुरु झाले आहेत. चाळीसगाव बाजार समितीत मंगळवारपासून बंद असलेले कांदा लिलाव २ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे.

निर्यातबंदी आणि त्यानंतर कांदा साठ्यावर मर्यादा घातल्याने नाशिक येथील व्यापार्‍यांनी कांदा खरेदी बंद केली होती. याचे पडसाद चाळीसगाव येथे उमटून बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी २७ ऑक्टोबरपासून कांदा खरेदी थांबवली. परिणामी शुक्रवारपर्यंत सलग चौथ्या दिवशी लिलाव बंद होते. यामुळे कांदा खरेदी विक्रीतून चाळीसगाव बाजार समितीत दररोज होणारी ४० लाखांची उलाढाल ठप्प आहे. दरम्यान, शुक्रवारी ईद-ए-मिलाद, शनिवारी व रविवार सुटीमुळे बाजार समिती बंद आहे. त्यामुळे आता सोमवारीच कांदा लिलाव पूर्ववत होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com