चाळीसगाव : कंटेनर- ट्रॅक्टरच्या धडेत एक जण ठार
Accident

चाळीसगाव : कंटेनर- ट्रॅक्टरच्या धडेत एक जण ठार

दोघे गंभीर जखमी, मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव-धुळे रोडवर तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्याजवळ कंटेनरने कांद्याने भरलेल्या ट्रक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक्टरच्या ट्रॉलीवर बसलेला एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मयताचे नाव बारकू राजेंद्र सोनवणे (रा.अस्ताने ता.मालेगाव )असे आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला चालकाविरोधात जगुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील रा.अस्ताने येथील दिपक दशरश बोरसे यांच्यासह देवीदास दादाजी पवार, राहुल दादाजी पवार, भिमा सोनवणे, बारकू राजेंद्र सोनवणे हे सर्व जण टॅक्टरसह ट्रॉलीने (एमएच.४१,एए ५८११) ने कांदे भरण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथे लालसिंग पाटील यांच्या आले होते. दि,२५ रोजी कांदे भरून वापस जात असताना, रात्री १२.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रोडवर चिचगव्हाण फाट्याच्या पुढे लेंडी नाक्यावर धुळ्याकडुन चाळीसगावकडे येणार्‍या भरधाव कंटेनर(क्र.एम.एच.०४, इएल,४३१३) ने ट्रक्टरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरवरील सर्व जण लांब अंतरावर फेकले गेले. यात बारकू राजेंद्र सोनवणे याना गंभीर मार लागल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर राहुल दादाजी पवार व भिमा रामा सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने उपचारसाठी भरती करण्यात आले.

कंटनेर चालकाने मयत व जखमीना कुठल्याही प्रकारची मदत न करता, घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला दिपक दशरश बोरसे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात कंटेनर चालकाविरोधात भादवी कलम ३०४(ए),२७९,३३७,३३८,४२७,१३४(ब),१८४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com