चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

‘ मला तुम्हाला, काही तरी दान देण्याचे आहे, असे सांगून काही रक्कम ६८ वर्षांच्या आजीबाईच्या हातवर ठेवून, अज्ञात भामट्याने गोडबोलून हातचालाखीने वृध्देच्या अंगावरील ४० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे.

हि घटना गणेश रोड परिसरात संकाळी ११.३० वाजेच्या सुमास घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हां दाखल झाला आहे.

सरुबाई हरी चौधरी रा.चौधरीवाडा ह्या बुधवारी गणेश रोड परिसरातून काम निमित्ताने जात असताना, अज्ञात भामटा त्यांच्या जवळ आला, आणि मला तुम्हाला काही तरी दान करायचे आहे, असे सांगून सरुबाई यांच्या हातात काही रक्कम ठेवली.

त्यानतंर माझा मित्र देखील तुम्हाला पैसे दान करणार आहे, परंतू तुमच्या अंगावरील दागिने पाहून तो तुम्हाला दान करणार नाही, म्हणून तुम्ही अंगावरील दागिने काढुन पिशवीत ठेवा असे सांगीतले.

सरुबाई यांनी भामट्याने सांगीतल्याप्रमाणे अंगावरील सोन्याचे जवळपास ४० हजार रुपये किमतीचे सर्व दागिने काढले व ते एक रुमालात बांधले आणि पिशवीत ठेवले, परंतू अज्ञात भामट्याने हातचालाखीने त्या रुमालातील दागिने लांबविले.

तसेच मी तुम्हाला नवीन साडी घेवून येतो असे सांगून गेला, तो परत आलाच नाही. थोड्यावेळाने सरुबाई पिशवीतील रुमाळात ठेवलेले दागिने पाहिले असता, ते मिळुन आले नाहीत.

याप्रकरणी सरुबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात भामट्याविरोधात भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.धर्मराज पाटील करीत आहेत.