महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडात खोटे बोलण्याचे मशीन

चाळीसगाव :ओबीसंचे राजकिय आरक्षण रद्द मुळे तरुण विस्थापीत होतील, भाजपातर्फे चक्का जाम आदोलन, आ.मंगेश चव्हाण यांचा घणाघात, आंदोलनामुळे दोन तास वाहतुकीचा खोेळंबा
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडात खोटे बोलण्याचे मशीन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सरकाराने न्यायालयात भक्क बाजू न मांडल्यामुळे रद्द झाले आहे. ओबीसी आरक्षणाचा फायदा समाजातील सर्वच घटनातील तरुणांना होत होता. ओबीसीच्या राजकिय आरक्षणामुळे (OBC reservation) बरेच नेते राजकियदृष्ट्या प्रस्थापीत झाले. परंतू आजचा तरुण आरक्षण रद्द झाल्यामुळे विस्थापीत होणार आहे.

(Supreme Court) सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. एक वर्षाच्या मुदतीत ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आदेश असताना या निष्क्रिय सरकारने गंभीर दुर्लक्ष केल्यामुळे आज राजकीयदृष्ट्या मोठा आघात ओबीसी समाजावर झालेला आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे सर्वच बाबतीत नियोजन शून कारभार करीत असून खोटे बोलत आहेत. खोटे बोलण्याचे मशीन त्यांच्या तोडातच असून त्यांची आकडेवारीची मोजणी केली तर निश्‍चित ते जास्त दाखवले असा घणाघात, आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी BJP भाजपाच्यावतीने आयोजीत चक्क जाम आंदोलनात केला.

शहरातील (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉईंट येथे चाळीसगाव भाजपाच्या वतीने रास्ता रोको (चक्का जाम) आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्य व ओबीसी घटकातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

चक्का जाम आंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. तर दरम्यान अंत्ययात्रा आल्याने स्वर्ग रथाला आदोलकर्त्यांनी वाट मोकली करुन देत माणुसकी धर्म जपला. तसेच आमदारांनी देखील त्यांचे भाषण पाच मिनिटांसाठी थांबवले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com