कमलशांती लॉन्सवर गुन्हा दाखल नाहीच..

पोलीस निरिक्षक म्हणतात दंडावर विषय संपला
कमलशांती लॉन्सवर गुन्हा दाखल नाहीच..

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

करोना साखळी तोडण्यासाठी सद्या लॉकाडाऊन चालू आहे. यात लग्नासाठी फक्त २५ लोकांची संख्या ठरवून दिलेली असतानाही चाळीसगांव शहरा लगत असलेल्या कन्नड रस्त्यावरील कमलशांती या भव्य लॉन्समध्ये शासनानाच्या नियामाचे उल्लघन करुन, तब्बल १६० ते १६५ वर्‍हाडी मंडळी उपस्थित लग्नसोहळा होत असतानाच, बुधवारी नगरपरिषदे व पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकुन, लग्न सोहळाचे आयोजन करणार्‍या वधु-वर आशा दोघांना मिळुन तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावला.

कमलशांती लॉन्सच्या मालकावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हां दाखल केला नाही. हा विषय दंडावर संपला आहे.

विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरिक्षक, चाळीसगाव

परंतू ज्या लॉन्समध्ये लग्न लागत होते. त्या लॉन्स चालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही. नियमाचे उल्लघन करुन गर्दी जमविल्यास १८८ प्रमाणे गुन्हां दाखल करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश आहेत.

परंतू चाळीसगाव पोलीसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कमलशांती लॉन्सच्या मालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही हे विशेष म्हणता येईल.

याविषयी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना विचारांना केली असता, दंडात्मक कारवाई करण्यात आली असून फक्त दंडावर विषय संपल्याचे ते म्हणाले.

लग्न कार्यातील वर्‍हाडी संख्या २५ च्या संख्येने ठरवून दिलेली असतांना बुधवारी कमल शांती लॉन्समध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर या गावातील लग्न सोहळा क्षमतेपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती मिळाल्यानतंर

पोलीस प्रशासनातील ए. पी.आय. महावीर जाधव, पो. कॉ. गणेश पाटील, पो. कॉ. संभाजी पाटील, तसेच न. पा. प्रशासनातील अभियंता कुणाल महाले, दिनेश जाधव, प्रविण तोमर, जितेंद्र जाधव, संजय देशमुख, प्रशांत सोनवणे, प्रसाद बाविस्कर आणि सुमित सोनवणे यांना मिळाल्यानंतर दुपारी कमलशांती लॉन्समध्ये सुरु असलेल्या विवाह सोहळ्या प्रसंगी वरील पथकांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास १६० ते १६५ वर्‍हाडी मंडळी उपस्थित असल्याचे आढळून आले.

या सोहळ्यातील आयोजक संजय सुदर्शन जैस्वाल रा. लासूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्याकडून ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

मात्र ज्या लॉन्समध्ये हा विवाह सोहळा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत पार पाडला जात होता अशा लॉन्स चालकालावर कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नाही.

कमलशांती लॉन्स हे बोहरा नावाच्या श्रीमंत व्यक्तीचे असून त्यांचे अनेक राजकारण्याशी संबंध असल्याची चर्चा आहेे, आणि त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हां दाखल करण्यासाठी पोलीस धजावत नसल्याची देखील बोलले जात आहे.

पोलिसांनी आतापर्यंत दोन ते तीन मंगल कार्यालयवर दंडात्मक कारवाईसह १८८ प्रमाणे गुन्हां दाखल केला आहे. परंतू कमलशांतीवर गुन्हां दाखल का ? केला जात नाही आहे.

असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून कमलशांतीच्या मालकाने पोलिसांची ‘ आर्थिक शांती ’ तर केली नाही ना? अशी देखील चर्चा त्या निमित्ताने होत आहे.

वास्तीव पाहता जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना नियमावली भंग करणार्‍यावर १८८ प्रमाणे त्वरित गुन्हां दाखल करण्याचे आदेश संबंधीताना पारीत केले आहेत.

परंतू चाळीसगाव पोलिसांनी कमलाशांती लॉन्सवर गुन्हां दाखल न करुन एकप्रकारे जिल्हाधिकार्‍यांची आदेशांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणाची वरिष्ठानी दखल घेवून, योग्य ती कारवाई करावी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com