चाळीसगाव : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादीचे खड्ड्यात वृक्ष लावून आदोलन

तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन
चाळीसगाव : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादीचे खड्ड्यात वृक्ष लावून आदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहर विकासआघाडी व (Nationalist Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मा.आ.राजीव देशमुख (Former MLA Rajiv Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमूळे नगरपालिका प्रशासनाविरोधात रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवट करुन आज (दि,११) तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

गेले ४ वर्षांपासून शहरातील रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे, खरजई नाका ते दयानंद हॉटेलपर्यंत गेल्या वर्षी रस्ता करण्यात आला होता. परंतु एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे, सिग्नल पॉईंट ते कचेरी पर्यंत सुद्धा चालणे अवघड झाले आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रोजच्या अक्सिडेंटच प्रमाण वाढत आहे. नगरपालिका प्रशासनाने तर गेंड्याच्या कातडीचे स्वरूप घेतले आहे, गेली ४ वर्ष शहरातील नागरीक व व्यापारी हे सहन करीत आहेत, फक्त कागदावरच नगरपालिकेचा कारभार पाहावयास मिळतो आहे आता तरी प्रशासनाला जाग येईल का? चाळीसगांव शहरातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झालेले असतांना, सामान्य जनतेला मणक्याचे व पाठीचे त्रास चालू झाले असून महिलांना तर गाडी चालवणे हे अतीशय कठीण झाले आहे, सिग्नल चौक पासून ते घाट रोड जाण्यासाठी अर्धा तास लागतोय, खड्यामुळे कायम ट्राफिक जाम असते, गणेश रोड कॅप्टन कॉर्नर कचेरी अंधशाळा ते कचेरी ह्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे.

आज राष्ट्रवादी कॉग्रेस व लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकास आघाडी तर्फ खड्याभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व कचेरी ते सिग्नल व गणेश रोडवर रॅली काढण्यात येवून आदोलन करण्यात आले. यावेळी युवानेतृत्व योगेश पाटील, जिल्हा दूधसंघाचे संचालक प्रमोद पाटील, रा.कॉं.तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, नगरसेवक भगवान पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिवआप्पा गवळी, जगदीश चौधरी, रवींद्र गिरधर चौधरी, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, हरीनाना जाधव, बाजीराव दौंड, परिघा आव्हाड, हेमांगी शर्मा, स्नेहल देशमुख, आर.के.माळीसर, खुशाल पाटील, भैय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, मिलिंद शेलार, विजय शितोळे, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, मोहित भोसले तालुकाध्यक्ष रा.यु.कॉंग्रेस, शुभम पवार शहराध्यक्ष रा.यु.कॉंग्रेस, गौरव पाटील शहराध्यक्ष रा.वि. कॉंग्रेस, सुजित पाटील, विलास पाटील, राकेश राखुंडे, आव्हाड सर, दिनेश महाजन, भैय्यासाहेब महाजन, सौरभ त्रिभुवन, रिकी सोनार, गुंजन मोटे, शरदसिंग राजपूत, विनोद गवळी, कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख, रफिक शेख, सुरज शर्मा, दीपक शिंदे, कुंतेश पाटील, प्रतिक पाटील, विकास बोंडारे, निखील देशमुख, पप्पू राजपूत, मंगेश वाबळे, कुलदीप निकम, हृदय देशमुख, अतुल चौधरी, शुभम गवळे, घनश्याम जगताप, सिद्धार्थ देशमुख आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com