चाळीसगाव : जेसीबीव्दारे नालेसफाईस प्रारंभ

नाल्याची स्वच्छता न.पा.तर्फे युद्धपातळीवर
चाळीसगाव : जेसीबीव्दारे नालेसफाईस प्रारंभ

चाळीसगाव | प्रतिनिधी

पावसाळा तोंडावर आला असताना, तरी देखील चाळीसगाव नगर परिषदेला नालेसफाई करण्यात येत नव्हती. यासंबंधी दैनिक देशदूत वेळोवळी वृत्त प्रकाशीत केल्यानतंर, यांची दखल घेत, शुक्रवारी(दि,२८) शहरातील लहान नाल्याची सफाईस न.पा.च्या कर्मचार्‍यांनी प्रारंभ केला. जे नाले कर्मचार्‍यांना साफ करणे शक्य आहे. ते सर्व नाले कर्मचार्‍यांमार्फत साफ करण्यात येणार येत आहे. तर आजपासून(शनिवार) शहरातील मोठ्या नाल्याची जेसीबीव्दारे स्वच्छता करण्यास प्रारंभ झाला आहे. युद्धपातळीवर काम करुन पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सर्व नाल्याची स्वच्छता न.पा.तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शुक्रवारी शहारातील प्रभाग क्र.५,१४,१५,१६ मधील लहान नाल्याची सफाई करण्यात आली. तसेच आनंदवाडी, बाप्पा पॉंईट, करगाव मोरी जवळील नाल्याची देखील सफाई कर्मचार्‍यामार्फत करण्यात आली. आजपासून(दि,२९) जेसीबीव्दारे शहरातील मोठ्या नाल्याची स्वच्छता करण्यासा प्रारंभ झाला. शहरातील घाटरोडस्थित छाजेड ऑईल मिल परिसरातील इस्मालपुरा भागातील नाल्याची स्वच्छता करण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती न.पा.चे आधिकारी संजय गोयर यांनी दिली आहे.

तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वीच युध्दपातळीवर शहरातील सर्व मोठ्या नाल्याची स्वच्छता केली जाणार आहे. नालेसफाई मुख्याधिकारी नितीन कापडणीस, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा अशाबाई चव्हाण, आरोग्य सभापती सायली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.चे आधिकारी संजय गोयर, तुषार नकवाल, दिलीप चौधरी, सचिन निकुंभ यांच्यासह न.पा.चे कर्मचारी राहुल निकम, विजय जाधव, राजू चौधरी, अनिल गोयर, राजेश चंदले व इतर कर्मचार्‍यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com