दोन वर्षांपासून रखडलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

१४७ कोटी रुपयांच्या भुयारी गटार प्रकल्प
दोन वर्षांपासून रखडलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

शहरासाठी महत्वाचा असलेला १४७ कोटी रुपयांच्या भुयारी गटार प्रकल्पाचा(मलनिस्सारण प्रकल्पाच्या) कामाचा शुभारंभ दि,२१ रोजी प्रभाग क्र १ मधून झाला.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या व सर्वत्र चर्चेत असलेल्या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाल्यामुळे अनेक चर्चांना आता विराम मिळाला आहे.

शहराच्या विकासात महत्वाची असलेली भुयारी गटार योजना पुन्हा पुर्वव्रत सुरु झाल्यामुळे, शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सगळ्यांच्या सहकार्याने सदर काम सुरळीत पडेल अशी अपेक्षा आहे.

घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक

नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, विजया पवार, ड्रीम्स कंस्ट्रक्शनचे प्रशांत संघवी, यांच्यासह प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. न भूतो न भविष्यती अशा अनेक महत्वाच्या योजनांना भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळून नगरपालिकेच्या खात्यात तो निधी जमा झाला.

परंतु केवळ नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि काही नगरसेवकांच्या आडमुठेपणा मुळे भुयारी गटार योजना यसह इतर योजना खोळंबल्या होत्या.

दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी चाळीसगाव शहरातील भुयारी गटार (मलनिस्सारण प्रकल्प) योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ६८.४४ कोटींच्या कामास वर्क ऑर्डर मिळाली. कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर जाणीवपूर्वक काही नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणत काम बंद पाडले होते.

वादाच्या भोवर्‍यात अडकलेला हा प्रकल्प पुर्वव्रत करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महत्वाची भूमिका पार पाडत व तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या ठोस निर्णय क्षमतेमुळे जिल्हाधिकारी यांनी काम सुरु करण्यासंदर्भात पुन्हा निर्णय दिला, आणि अखेर कामाचा शुभारंभ झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com