चाळीसगाव : खासदारसाहेब तूर्तास इतकेच...!

भाजपाच्या शहराध्यक्षांचे खा.उन्मेष पाटील यांच्यावर सोशल मिडियावर पोस्टव्दारे गंभीर आरोप, सोन्यासारखा चमकवलेला कोळासाच निघाल्याची खासदार गटातून चर्चा, न.पा.च्या निवडणुकीच्या तोंडावर आशा पोस्टमुळे नागरिकांचे मनोरंजन
चाळीसगाव : खासदारसाहेब तूर्तास इतकेच...!

मनोेहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव (chalisgaon) भाजपामध्ये (Bjp) गेल्या काही वर्षांपासून पक्षाअर्ंतगत कलह (Quarrel) सुरु आहे. तो आज पुन्हा चव्हाट्यावर आला आहे, भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील(Corporator Ghrishneshwar Patil) यांनी खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांना सोशल मिडियावर (Social media) पोस्ट(लेख) पाठवून आपण पक्षाविरोधात आपण काम करीत असल्याची जाहिर नाराजी प्रकट केली असून त्यांच्यावर गंभीर आरोप(Serious allegations) केले आहेत. तर ज्याच्या डोक्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी हात ठेवून राजकिय क्षेत्रात सोन्यासारखा चमकवला, शेवटी तो कोळासाच निघाल्याची चर्चा खासदार गटातून होत आहे. या पत्रामुळे मात्र अगामी न.पा.च्या व इतर निवडणुकावर बराच परिणाम पाहवयास मिळणार असल्याचे बोलले जात असून भाजपाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय म्हटले आहे?, या पोस्टमध्ये-

आपण पक्षाच्या अनेक जुन्याजाणत्या लोकांना बाजूला सारत आहात, ‘ जणू नया जोडो, पुराना छोडो’ हा विचारच आपल्या मनात काय ? असा प्रश्न तालुक्यात आपल्या संदर्भात निर्माण झाला आहे, व आजही तीच प्रथा पुढे चालू ठेवत नव्याने जोडलेल्या कार्यकर्त्यांना देखील बाजूला सोडत त्यांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी पर्याय देत आहात. भाजपच्या चाळीसगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याने घरच्या भाकरी खात आपला लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करत महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या मताधिक्याने निवडून आणले. भाजपच्या उमेदवारीवर म्हणजे कमळावर निवडून आला आहात हे आपण विसरले आहात कि काय ? असा प्रश्न माझासह सर्वच कार्यकर्त्यांना सध्या पडला आहे.

सन २०१९ च्या विधानसभेच्या जागेसाठी आपल्या सर्वात जवळचे मित्र तथा विश्वासू साथीदार म्हणजेच आजचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. सर्वांना वाटायचे कि आपण आपल्या मित्राला साथ देत आमदार कराल, तिकिटासाठी शिफारस कराल, परंतु समस्त तालुक्याने आपल्यातला स्वार्थी माणूस पाहिला.

तिकिटासाठी मित्राची शिफारस तर दूरच आपण जवळचा कुणीच मोठा नको झाला पाहिजे, नव्हे तर मीच सर्वश्रेष्ठ असा अहंकार बाळगत मित्रत्वाला तडा देत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक कटकारस्थान रचले, याविषयाची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात होती. २५००० मतांनी मंगेश चव्हाण निवडून येतील असे छाती ठोकून सांगणारा माझा एक मित्र, मंगेश चव्हाण हे जवळपास ४५०० मतांनी निवडून आल्यावर खासदारांनी विरोधात काम केले, असा तुमच्या पक्षाचा गद्दार खासदार काय कामाचा हे सांगत होता, तेव्हा माझी मान शरमेने खाली गेली.

आपली निवडणूक तर झाली, आमदारांचीही निवडणूक झाली. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आगामी काळात आहेत. आणि अशा परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती. याउलट मात्र नुकतेच आपण शहरात घेतलेले कोरोना लसीकरण शिबिरात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. पक्षातील जी गटबाजी लपून होती किंवा फक्त चर्चेत होती, ती आपण उघडच केली. अनेक ठिकाणी शहरात प्रभागनिहाय आपण शिबिरे घेतलीत व ज्यांच्या माध्यमातून घेतलीत त्यांनी तुमच्या फोटोसह मोदी साहेबांच्या फोटोचे बॅनर लावलेत, परंतु हे करत असतांना आपण बॅनरवर ना कमळ घेतले ना पक्षाचा प्रोटोकॉल.

एवढंच काय लसीकरण शिबिराच्या आयोजनाच्या काही ठिकाणच्या बॅनरवर आपल्या म्हणजेच भाजपच्या खासदारांसह विरोधी पक्षाच्या काही लोकांचे एकत्रित फोटो होते. यावरून नेमके समजायचे तरी काय ? या गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, नव्हे तर खासदार साहेबांनी त्यांच्या मनातील नगरपालिकेचे उमेदवारच जाहीर केले अशी चर्चा जनमानसात आहे. अहो आपण २०१४ ला विधानसभेला निवडून आल्यापासून बदनामीची चादर माझा अंगावर घेतली, आपण करत असलेल्या अशा हालचालींमुळे भारतीय जनता पक्षाचे खच्चीकरण करत आहात हे मात्र नक्की.

मी आपणास सल्ला देण्या इतका मोठा तर नाही. परंतु येणार्‍या काळात पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपणास चाललेल्या या सर्व प्रकारावर जाब विचारल्या शिवाय राहणार नाही हे मात्र लक्षात असू द्या. व इतर अनेक गंभीर आरोप खासदारांना लिहलेल्या पोस्टमध्ये करण्यात आले असून शेवटी तूर्तास इतकेच...! असा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुढे घृष्णेश्‍वर पाटील वेळोवेळी पोस्टव्दारे खासदारांच्या पक्षाविरोधात व इतर कामांची पोलखोल करणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

सोन्यासारखा चमकवलेला, शेवटी कोळासाच निघाला-

भाजपाचे शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील यांनी सोशल मिडियावर खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात टाकलेल्या पोस्टमुळे चाळीसगावच्या राजकारणात अनेक चर्चांना ऊत आला आहे. खासदार उन्मेष पाटील या पत्राला काय? उत्तर देतील ते माहिती नाही. तसेच त्यांच्याकडून अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. घृष्णेश्‍वर पाटील यांनी कुठल्याही प्रकारची लेखी पत्र खासदारांना पाठवलेले नाही, त्यामुळे फक्त सोशल मिडियातून पोस्ट करण्यामागे त्यांचा नेमक उद्देश काय?

अशा विविध चर्चांना खासदार गटातून ऊत आला. घृष्णेश्‍वर पाटील यांच्या डोक्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी हात ठेवून, त्याना राजकिय क्षेत्रात सोन्यासारखे चमकवले, त्यांच्या अनेक गुन्हांवर पाघरुन घातले.

परंतू त्यानीच खासदारांविरोधात भूमीका घेतल्याने, ‘ कोळशाला सोन्यासारखे चमकवले, मात्र शेवटी तो कोळासाच निघाल्या ’च्या प्रतिक्रिया खासदार गटातून उमटत असून ही पोस्ट(लेख) घृष्णेश्‍वर पाटील यांनीच लिहलेली आहे, की त्यांना कोणी रसद देवून लिहते केले आहे, असा देखील प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे आता भविष्यात असे अनेक पोस्ट(लेख) न.पा.च्या व इतर निवडणुकीत सोशल मिडियावर पाहवयास मिळणार आहे. यातून लोकांचे चांगल्याप्रकारे मनोरंजन होणार असून सत्यस्थित बाहेर येईल, यात दुमत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com