Video चाळीसगाव : मेडीकल दुकान फोडले; ८५ हजारांचा मुद्देमाल लपास

चोरटे सीसीटीव्हीत कैद, कारसह चोरीचे साहित्य टाकूण चोरट्यांचे पलायन
Video चाळीसगाव : मेडीकल दुकान फोडले; ८५ हजारांचा मुद्देमाल लपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कॉप्टन कॉर्नर येथील समर्थ हॉस्पीटलच्या खाली असलेले मेडीकलचे शटरची कटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेचा डीव्हीआर असे एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल लपास केला आहे. तर शहरातील नवजीवन मेडीकल येथे चोरीचा प्रयत्न सुरू असताना एकाने पोलिसांना फोन केल्यावर पोलिसांनी शोध घेऊन, संशयित इंडिका वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केल्यावर चोरटे वाहन व चोरीचे साहित्य सोडून पळून गेले आहे. ही घटना दि ११ रोजी रात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

योगेश वाल्मीक येवले यांचे मालकी याचे समर्थ हॉस्पीटलच्या मेडीकलचे दुकान आहे. दि,१० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिवसभराचेे काम आटपून जमा झालेला गल्ला ड्रावरमध्ये ठेवून, तो लॉक केला. व नतंर मेडीकलचे बंद करुन घरी गेले. त्यानतंर दि,११ रोजी रात्री ३ च्या सुमारा हॉस्पीटलमध्ये झोपण्यासाठी आलेल्या विशाल शिंदे यांचा योगेश येवले यांना फोन आला की, तुमच्या मेडीकलचे शटर उघडे आहे, येवले यानी तात्कल मेडीकल दुकान गाठले व आत जावून पाहिले असता, गल्ल्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम ८० हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. त्यांनी तात्काल पोलीस स्टेशनला माहिती दिली. याप्रकरणी येवले यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सचिन कापडणीस करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत शहारातील नवजीवन हॉस्पीटल येथील मेडीकलचे कुलूप तोडत असतानाच एकाने पोलीस स्टेशनला रात्री फोन केल्यावर ठाणे अंमलदार भगवान उमाळे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व वरिष्ठांना आणि गस्तीवर असलेल्या सहाय्यक फौजदार प्रकाश महाजन, पोलीस नाईक संदीप पाटील, होमगार्ड अनिकेत जाधव यांना दिल्यावर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर भडगाव रोडवर पांढर्‍या रंगाचे इंडिका क्र चक ३० झ १७८९ ही संशयास्पद रित्या भरधाव वेगाने घाटारोड कडे जाताना दिसल्यावर त्यांनी पाठलाग केला, मात्र वाहन नागद रोड कडे गेल्यावर महाजन यांनीसिनेस्टाईल हातातील काठी इंडिकाला मारून काच फुटली आपला पाठलाग होत असल्याचे समजून आल्याने व आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी हळू करून वाघडू शिवारात चोरीचे हत्यारे सोडून पलायन केले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे पोलीस पथकासह पोहोचले व पोलिसांनी रात्रभर शोध घेतला असता, चोरटे मिळून आले नाही. इंडिकाचा शोध घेतल्यावर इंडिका गाडी ही आडूळ बु ता.पाचोड जिल्हा औरंगाबाद येथील असून औरंगाबाद येथून ३ दिवसांपूर्वी चोरी गेल्याचे समजले आहे. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com