चाळीसगाव : लॉकडाऊनचे निर्बंध वार्‍यावर...!

अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही चोरीछुपे उघडी
चाळीसगाव : लॉकडाऊनचे निर्बंध वार्‍यावर...!

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीला आळा घलण्यासाठी शासना वाटेल ते प्रयत्न करीत आहे. परंतू नागरिकांच्या व प्रशासनाच्या उदासिनेमुळे ते फौल ठरीत आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नागरीकांच्या दैनंदिन गरजांतील काही अत्यावश्यक व्यवसायांना संकाळी सात ते दुपारी ११ वाजेपर्यंन्त वेळ दिली आहे.

परंतू चाळीसगाव शहरात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने देखील चोरी छुपे उघडी केली जात असून नेमके अत्यावश्यक कोण असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

तसेच दिवसभर रस्त्यावर मोठ्या प्रमाणा गर्दी दिसून येत आहे. चाळीसगाव पोलीस फक्त संकाळी ११ वाजेनतंर व सायकाळी ६ वाजेनतंर एक तास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात, दुपारीनतंर ते मात्र आराम करीत असल्याची चर्चा आहे.

लॉकडाऊनमध्ये शासनातर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंन्त अत्यावश्यक सेवेतील मेडीकल, किराणा दूध, भाजीपाला, चिकन, फ्रुट अशा काही नागरीकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत वस्तुंची दुकाने उघडी ठेवण्यास शासनाची परवानगी आहे.

मात्र चाळीसगांव शहरात या वेळेत अत्यावश्यक बरोबरच सर्वच सुकाने उघडी तर काही अर्धे शटराने उघडी दिसत असल्याने या दुकानांमुळे रस्त्यांवर वेगवेगळ्या वस्तुंच्या खरेदीसाठी नागरीक महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे.

यावेळात सोशल डिस्टस्टींगचे सर्व नियम धाब्यावर बसवणारे नागरीक आणि दुकानदार देखील पहावयास मिळतात. विशेष म्हणजे दररोज सकाळी शहर आणि तालुक्यातील नागरीक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने शहरातील प्रत्येक रस्त्यांवर सणा-सुदीला जशी गर्दी उसळते तशी गर्दी पहावयास मिळते.

शहरातील भाजीपाला मार्केट, सावरकर चौक, स्टेशनरोड आणि घाटरोडवर वाहतूकीचा खोळंबा होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तसेच संचारबंदी लागू असतानाही शहरातील सर्व रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी संकाळी ११ नतंर व सायंकाळी ६ नतंर रस्त्यावर प्रमाणिकपणे एक तास दिसतात. त्यानतंर ते दिसेनासे होत असल्याची चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com