चाळीसगाव : दिड कोटींचा जम्बो ऑक्सीजन प्लांट उभरणार

चाळीसगाव : दिड कोटींचा जम्बो ऑक्सीजन प्लांट उभरणार

कोविड केअर सेंटरला २१ जणांची तात्पुरती पद भरती, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

एकीकडे करोना संसर्ग वाढत असतांना दुसरीकडे ऑक्सीजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

तालुक्यात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा कायस्वरुपी कशा देता येतील, याबाबतचे नियोजन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून डीपीडीसी योजनेतून १३५ क्षमतेचा १ कोटी ३७ लाख रूपये खर्चाचा जम्बो ऑक्सीजन प्लंाट उभारण्यात येणार, त्यांची प्रशासकिय मान्यता येत्या दोन दिवसात येणार असून लवकरच हा प्लॉन्ट कार्यन्वीत होणार असून कोरोना व इतर रुग्णाना भासणारी ऑक्सीजनची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे.

मंगेश चव्हाण, आमदार

या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे डीपीडीसी योजनेतून १३५ क्षमतेचा १ कोटी ३७ लाख रूपये खर्चाचा जम्बो ऑक्सीजन प्लंाट उभारण्यात येणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एन.एस. चव्हाण प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

आमदार चव्हाण यंाच्या आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रक्त तपासणी मशीन, ऑक्सिजन मशीन, एअर कंडिशनर, आयसीयू बेडस, दोन बेडस मध्ये कर्टन्स, स्वछतेसाठी टाईल्स क्लिनर आदी नवीन मशिनरी उपलब्ध होणार आहेत.

येत्या ८ दिवसात जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध करण्याबरोबरच गरज वाटल्यास अजून ५० बेडस क्षमता तातडीने वाढविण्यासाठी सर्व साहित्य करून देण्याबाबतही आमदार चव्हाण व जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बैठकीत या प्लांटला येत्या दोन दिवसात प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

करोनाचा वाढता संसर्ग आणि ऑ्नसीजनचा तुटवडा लक्षात घेऊन हवेतून शोषून घेऊन ऑ्नसीजन निर्मीती करणार्‍या प्रकल्पांची जिल्ह्यात १० ठिकाणी उभारणी करण्याची माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी अलीकडेच यावल येथे दिली होती.

या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे प्रकल्प उभारला जात असल्याने चाळीसगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीत जिल्हा प्रशासनाकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीनुसार कोविड केअर सेंटरला ४ मेडिकल ऑफिसर, ४ स्टाफ नर्स, १० वार्डबॉय, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, १ एक्सरे टेक्निशियन अशी २१ नवीन तात्पुरती पद तात्काळ भरली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ५ व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या ३८ वरून ७० इतकी वाढविण्यात येणार.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com