अं.ब.हायस्कूलमध्ये हॉरर चित्रिकरणाची ‘ परछाया ’

विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम ? माजी विद्यार्थी व संचालकांमध्ये प्रचंड नाराजी,‘ परछायेच्या ’ चित्रिकरणाच्या परवागीसाठी ५ हजारांची माया
अं.ब.हायस्कूलमध्ये हॉरर चित्रिकरणाची ‘ परछाया ’

मनोहर कांडेकर - चाळीसगाव chalsigaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील नावजलेल्या व शंभर वर्षांची परंपरा असलेल्या अं.ब.हायस्कूलमध्ये ‘ परछाया ’ या हॉरर वेब सिरीज लघू चित्रपटाचे शृटिंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या लघू चित्रपटाची क्लिप देखील समाज माध्यातून व्हायरल झाली आहे. परछाया हॉरर चित्रपटाच्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात भिती निर्माण होणार असल्याची खंत माजी विद्यार्थांंसह काही संचालकांनी व्यक्त केली असून परछाया चित्रपटच्या चित्रीकरणाच्या परवागीसाठी ५ हजारांची माया घेतल्याची चर्चा माजी विद्यार्थांमध्ये आहे. तर शाळेत चित्रपटास परवागी दिलीच कशी ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून या प्रकारमुळे संस्थेची पुन्हा एकदा बदनामी झाल्याची चर्चा आहे.

चाळीसगाव शैक्षणिक इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी. या संस्थेच्या बालवाडी पासून तर महाविद्यालयापर्यंत अनेक शाखा आहेत. या संस्थेचे १९०९ मध्ये आनंदीबाई बंकट हायस्कूल स्थापन झाले. या शाळेने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले. ज्यांनी देशविदेशात महत्वाची भूमिका बजावून आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले. आणि आजही करीत आहेत. या शाळेला ध्येयवादी शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक मिळाले. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख सदैव चढताच राहिला. तसेच नामवंत शिक्षकांनी देखील संस्थेच नाव भूषवले आहे. या सर्वांची नावे आजही आदराने घेतली जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत. परंतू गेल्या काही वर्षांपासून या शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षण संस्थेची आब्रु वेशीला टागली गेल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

आनंदीबाई ह्या माझा पंज्जी होत्या, आम्ही शाळेच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले आहे. आशा प्रकारे हॉरर चित्रपटाचे चित्रकरण शाळेत झालेतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, परवागी देतांना आम्हाला का विचारात घेतले नाही. उद्या एखाद्या आश्‍लील चित्रपटास देखील हे संचालक मंडळ परवागी देईल. त्यामुळे शिक्षण विभागाने चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी.

आनंदा अनिल बुदंलेखंडी, माजी विद्यार्थी

चित्रपटाच्या परवागी संदर्भात संचालक मंडळास विश्‍वासात घेण्यात आले नाही. एका विद्यचे मंदिरामध्ये अशा प्रकारच्या चित्रपटाचेे चित्रकरण होणे अपेक्षित नाही, याबाबत मी अं.ब.च्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीसा दिल्या असून तुम्ही कोणाच्या परवागीने चित्रकरणास परवागी दिली, याबाबत खुलासा मागीतला आहे. त्यांचा खुलासा आल्यानतंर त्वरित कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

डॉ.विनोद कोतकर, सचिव चाळीसगाव एज्यु.सो.

गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण संस्थेच्या घटनेत असलेला घोळ, बेकादेशिर संचालक मंडळ, पैसे घवून शिक्षक भरती, शिक्षकांची पिळवून या अनेक कारणामुळे या संस्थेचे नाव लौकीक धुळीस मिळाले आहे. यात अजुन भर पडली, ती अं.ब.शाळेत शाळेत एका वेब सिरीज लघू चित्रपटाच्या चित्रीकरणाची. नुकताच ‘ परछाया ’ या हॉरर बेव सिरीज चित्रपटाची शुटींग या शाळेच्या ईमारीत करण्यात आली.

ज्या व्यासपीठावर सानेगुरुजी व इतर महात्मा पुरुषांची कवीता म्हटली जाते, धडे दिले जातात, त्या ईमारीत अशा प्रकारच्या चित्रपटाचे चित्रकरण होणे योग्य नाही. यासंदर्भात आम्हा संचालकांना विचारात देखील घेतले नाही, याची खंत वाटत आहे. हॉरर चित्रपटांमुळे विद्यार्थींंची मानसीकता देखील घराब होवू शकते , व तो भविष्यात शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जावू शकतो. त्यामुळे हे अतिशय खेत दायक आहे.

डॉ.सुनिल राजपूत, संचालक चाळीसगाव एज्यु.सो.

शाळेच्या ईमारीत अशा प्रकारच्या हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणास परवागी देणे म्हणजे एक प्रकारे मुलांमध्ये अंधश्रध्दा पसरवण्यासारखे आहे. शाळेच्या इमारीतचा चित्रकरणासाठी वापर करणे कायदेशीर गुन्हा आहे. याची शिक्षण मंडळाने नोंद घेवून परवागी देणार्‍यांविरोधात कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. हॉरर चित्रपटामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यत आहे.

प्रा.गौतम निकम, जनआदोलन विभाग

या चित्रपटाचे ट्रेलरची पोस्ट समाज माध्यामून व्हायर झाली आहे. यात विद्यार्थी घाबरतील असे अनेक दृष्य दिसत आहे. त्यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्ती केली असून एक हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शाळेची इमारत दिलीच कशी ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थिती केला आहे.

ज्या शाळेतून नामवंत विद्यार्थी घडले आहेत. त्याच शाळेत प्रथमच असे चित्रकरण झाल्यामुळे त्यांनी समाज माध्यातून प्रचंड संताप व्यक्त केला असून उद्या एकाद्या ‘ सनी लियॉनच्या ’ चित्रपटास देखील संचालक मंडळ परवागी देईल अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यामान संचालक मंडळ हे मनमानी कारभार करीत आहे. मागील वर्षी देखील संस्थेच्या महाविद्यालयात पैसे घेवून प्राध्यापकांची भरती केल्याचे बोलले जात आहे. हा पैसा कोट्यावधी रुपयांचा घरात असून एकानेच आपल्या घरात ठेवल्याची देखील चर्चा आहे. लघू चित्रपट ‘ परछाया ’ यात अनेक दृष्य विद्यार्थांची मानसिकता विचलीत करणारे असल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहता दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेतील का ? असा देखील प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे या चित्रपटास परवागी देणार्‍या संचालक मंडळ किवा संबंधीतावर शिक्षण विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

पाच हजार रुपये घेवून परवागी

अं.ब.हायस्कूल शाळेची ईमारात ‘ परछाया ’ या लघू वेब सिरीज चित्रपटाच्या परवागीसाठी शाळेकडून ५ हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. परंतू परछायाच्या परवागीसाठी मोठ्या रक्कमेची माया घेतल्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच परवागी देण्यासाठी संचालक मंडळातील कुणाशीही सल्ला-मसलत करण्यात आली नाही. वास्तवीक पाहता मागील वर्षी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांंनी पैसे जमा करुन, जवळपास १० ते १२ वर्ग खोल्याचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे शाळेचे रुपटे पालटले आहे. माजी विद्यार्थांना व संचालक मंडळास विश्‍वास घेवून हा निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com