चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

पत्रकार हा नेहमीच समाजाच्या बाजूने सकारात्मक भूमीका मांडत असतो, आपल्या आजुबाजूला काय चालले आहे, याची माहिती सर्वांना पत्रकारांकडूनच मिळत असते, जे चुकीचे घडत आहे, त्यावर बोट ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतो, त्यामुळे पत्रकार हा समाज मनाचा आरसा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे नेते राजीव देशमुख यांनी केले.

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवारी उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण यांच्या दालनात पत्रकारांच्या छोटेखानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातील मान्यवर व जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानतंर महाविकास आघाडीच्या वतीने आघाडीचे नेते माजी आमदार राजीव देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, सुरेश भाऊ स्वार, नानाभाऊ कुमावत, प्रशांतनाना देशमुख, श्यामभाऊ देशमुख, रोशन भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक शेखर देशमुख, किसनराव जोर्वेकर, प्रशांत देशमुख आदिनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी पाटील, जेष्ठ पत्रकार सुनील राजपूत, जिजाबराव वाघ, मनोहर कांडेकर, आनन शिंपी, मुराद पटेल, दिलीप घोरपडे, अजित शेख, निंबा सोनार, स्वप्निल वडनेरे आदि पत्रकार उपस्थित होते. तर कार्यक्रमास नगरसेवक शेखर देशमुख, रविंद्र चौधरी, सदाशिव गवळी, सूर्यकांत ठाकूर, प्रदीप राजपूत, रोशन जाधव, प्रवीण जाधव, आकाश पोळ, सुनील गायकवाड, सुनील कुडे, वसीम चेअरमन आदी उपस्थित होते.