गणरायाच्या स्वागतासाठी बाजार फुलला

मुर्ती खरेदीसाठी गर्दी
गणरायाच्या स्वागतासाठी बाजार फुलला

चाळीसगाव- Chalisgaon - प्रतिनिधी :

आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येवून ठेपल्याने, त्यांच्या स्वागतासाठी एक दिवस आधिच चाळीसगाव येथे गणरायाच्या स्वागतासाठी बाजारात गर्दी दिसून आली.

बाप्पांच्या मुर्ती खरेदी, बुकींगसह इतर साहित्य खरेदीसाठी बाजारात शुक्रवारी लहान मुले, महिला, पुरुष व मंडळाच्या कार्यकर्त्यांची एकच रेलचेल होती.

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गणपती उत्साहावर बंधने आली असली, तरी देखील घरगुती गणपती मुर्ती बसविण्यासाठी लोकांमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्साह आहे. गणेशभक्तांनी सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शुक्रवारी गर्दी केली होती.

पर्यावरणपूरक मखर, कार्ड बोर्डच्या साह्याने तयार केलेले विविध आकर्षक मंदिर बाजारात उपलब्ध आहेत. तसेच मोती माळ, झुंबर, मुकुट यासह सजावटीचे विविध साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. तर श्रीं ची मूर्ती खरेदी, बुकिंगसाठी सार्वजनिक व घरगुती गणेशभक्तांनी बाजारपेठ थाटण्यात आलेल्या मूर्तिकारांकडे गर्दी केली होती.

बाजारात बाप्पांच्या नानविध रूप साकारले मूर्ति विक्रीसाठी आहेत. त्यामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध सर्वांना लागले असून त्यांची स्वागताचा जयत्ती तयारी भक्तांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com