<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>तालुक्यातील वाकडी येथील सुपुत्र व विरजवान अमित साहेबराव पाटील(३२) जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असतात, अंगावर बर्फ पडल्याने त्यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.</p>.<p>शोकाकुल वातावरणात दुपारी बीएसएफचे जवान व पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. विजप पाटील यांंच्या मुलाने पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी कुटुंबिसासह उपस्थित महिला, पुरुष, माजी सैनीक अनेकांना अश्रु अनावर झाल्याने जणू अश्रुचा महापूरच आल्याचे दृश्य दिसत होते. तत्पूर्वी पार्थिव गावात दाखल झाल्यावर आई-वडील भाऊ-बहिण व ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला होता. अंत्यविधीस आमदारांसह शासनाचे आधिकारी व इतर लोकप्रतिनिधी उपस्थिती होते.</p>