चाळीसगाव : एकाच दिवशी आढळले १९ करोना पॉझिटीव्ह रुग्ण

वैद्यकीय यंत्रणेची तारांबळ
चाळीसगाव : एकाच दिवशी आढळले १९ करोना पॉझिटीव्ह रुग्ण

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगाव शहरासह तालुक्यात एकाच एकाच दिवशी १९ करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून वैद्यकीय यंत्रणा हादरली आहे.

यात शहरातील बाराभाई महोल्ला 10, देवी गल्ली दोन, भवाळी एक, हनुमान वाडी एक, अहिल्यादेवी नगर एक , दस्केबर्डी एक, पाटीलवाडा एक, तांबोळे एक , भिम नगर 1 असे तब्बल 19 रुग्ण एकाच दिवशी आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांचे स्वॅब घेऊन, त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. एकाच दिवशी तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे चाळीसगाव कोरणाकोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिता बाळगून घरातच राहावे, तसेच जनता कर्फ्यू देखील काटेकोरपणे पालन करावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com