महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दमबाजी
जळगाव

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दमबाजी

लेट आल्याच्या कारणावरुन झाला वाद

Manohar Kandekar

चाळीसगाव - प्रतिनिधी - Chalisgaon :

तालुक्यातील मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकिय आधिकार्‍यांना लेट आल्याच्या कारणावरुन एकाने अरेरावी करत, त्यांच्या अंगावार धावून जावून, त्यांना दमबाजी केल्याची घटना आज संकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनल गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय आधिकारी वैदवी माधव पंडीत(३५) रा.मेहुणबारे यांना रुग्णालयात उशिरा का आल्या असा जाब विचारात गावातीलच भैय्यासाहेब देशमुख यांनी अरेरावी करत, त्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच मध्यस्थी करण्यासाठी गेलेले रुग्णालयाचे कर्मचारी गंगारधर शिरसाठ यांना देखील त्याने धक्क-बुक्की केली.

कोविड पार्श्‍वभूमीवर विना मास्क रुग्णालयाच्या आवारात येवून, त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी डॉ.वैदवी पंडीत यांच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला शासकिय कामात अडथळा आनला म्हणून भैय्यासाहेब देशमुख यांच्या विरोधात भादवी कलम ३५३,२६९,२७९,५०६,३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय हेमंत शिंदे हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com