Video चाळीसगाव : मरणानंतर अंत्यसंस्कारासाठी मरणयातना संपेना...!

भाजपा व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचे एकमेकांवर चिखलफेकचे पूण्यकर्म
Video चाळीसगाव : मरणानंतर अंत्यसंस्कारासाठी मरणयातना संपेना...!

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरात जिल्हात नसेल असे अमरधाम (स्मशानभूमी) आहे. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून येथील प्रेतांना जाळण्यासाठीच्या पाच शवदाहिनीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या प्रेताला मरणयात्रणा भोगाव्या लागत आहे.

नवीन शवादहिनीसाठी जवळपास सात लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. प्रशासकिय मान्यतेसाठी प्रकरण पाठविण्यात आले आहे. त्यांची मान्यता मिळाण्यानतंर लगेच निविदा प्रकिया राबविण्यात येणार आहे. लवकरच नवीन शवदाहिनी बसविण्यात येणार आहेत

आशालता चव्हाण,नगराध्यक्षा

अनेक संघटनासाठी नवीन शवदाहिनी बसविण्याची मागणी केल्याने, न.पा.च्या स्थायी समिती नवीन शवदाहिनी बाबतची ठराव करण्यात आला, मात्र अद्यापर्यंत नवीन शवदाहिनी बसविण्यात न आल्यामुळे मरणानतंरही प्रेतांची हेडसाळ न.पा.च्या भोंगळ कारभारामुळे होत आहे.

शहरात विकास कामे होत नसल्याचे भाजपा व शहवि आघाडीचे नगरसेवक एमेकांवर चिखफेख करण्याचे ‘ पुण्यकर्म ’ नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासामोर ठेवून सद्या करीत आहेत. परंतू शहरासाठी व प्रत्येकांसाठी अत्यंत महत्वचे असलेल्या विषयाकडे त्यांनी आतापर्यंत कडक आवाज उठवलेला दिसत नाही. किवा लोकसहभागातून देखील या शवदाहिनी त्वरीत बसविण्यासाठी समाजीक संघटना किवा इतरांनी प्रयत्न केलेले दिसत नाही.

करोना काळात अनेक प्रेतांना दुरावस्था झालेल्या शवदाहिनीवरच जाळण्यात आले. त्यामुळे आता या गंभीर प्रकरणाची आमदार मंगेश चव्हाण यांनी त्वरित दखल घेवून हा प्रश्‍न मार्गी लावावा. किवा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरवा करावा, अशी अपेक्षा शहवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

नगर परिषदेकडून ठराव होवून हे प्रकरण प्रशासकिय मान्यतेसाठी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतू प्रशासकिय मान्यता व निविदा प्रक्रिया होण्यासाठी अजुन किती कालवंधी लागेल हे सांगता येत नाही. तोपर्यंत शवदाहिनी दुरावस्था कायम राहणार आहे. आणि प्रेताची हेडसाळ देखील होणार आहे. याला जबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com