चाळीसगाव आगाराला मालवाहतूकीतून मिळाले ३० लाखांचे उत्पन्न

आगाराची मालवाहतुकीची वर्षपूर्ती, अंतर ७४ हजार ४५४ कि.मी., ५०८ फेर्‍या
चाळीसगाव आगाराला मालवाहतूकीतून मिळाले ३० लाखांचे उत्पन्न

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने सात ते आठ महिन्यांपूर्वी मालवाहतूक सेवाही सुरू केली होती. त्याला आता वर्ष पूर्ण होत असून या वर्षभरात चाळीसगाव आगाराला मालवाहतुकीतून तब्बल २९ हजार ८४ हजार ४१४ रुपयांचा फायदा झाला आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवासी गाड्यांमध्ये काहीअंशी बदल करून मालवाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. मालवाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात थोडी भर पडली आहे. चाळीसगाव हे तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असल्यामुळे येथील आगारातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुक होते. त्यातून आगाराला दररोज १० ते १२ लाखांचे व्हायचे, परंतू लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतुक बंद झाल्यामुळे आगारात आर्थिक उत्पन्न पूर्णता; बंद झाल्याने, आगाराची आर्थिक घडी विस्कटली होती. परंतू एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुक करण्याचा निर्णय घेतलामुळे, पुन्हा चाळीसगाव आगाराला नवसजिवनी मिळाली आहे. चाळीसगाव आगारातून सुरुवातीला चार बसेस(ट्रक)ने मालवाहतुकीस सुरुवात झाली.

पुढे हळुहळु मालवाहतुकीस व्यापार्‍यांनी पसंती दिल्यानतंर येथील आगारातून चारही बसेसव्दारे मालवाहतूक केली जावू लागली. गेल्या वर्षभारात येथील आगारातून मालवाहतुकीच्या ५०८ फैर्‍या झाल्यात. येथून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मालवाहतूक सेवा पुरविली जात आहे. यातून खते-बियाणे, आंबे, कांदे, झाडे, गुल, भरडधान्य अशा सर्व प्रकारच्या सामानांची वाहतूक करण्यात येते आहे. आतापर्यंत ७४ हजार ४५४ कि.मी. अतंर या चार बसेस व्दारे पूर्ण करण्यात आले.

एसटीने होणारी वाहतूक अधिक सुरक्षित असून प्रशिक्षण घेतलेले वाहनचालक यांच्यामार्फत ही सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर ही सेवा माफक दरात उपलब्ध असल्याने कारखानदारही एसटीच्या मालवाहतूक गाडीची मागणी करू लागले आहेत. यातून आगाराला वर्षभरात २९ लाख ८४ हजार ४१४ रुपयांचा आर्थिक फायदा झाला. त्यामुळे आगाराच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. १ जुलैच्या इंधनदरात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. परिणामी इंधन खर्चात वाढ झाली. यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाळीसगाव आगारात चार माल वाहतुक गाड्या असून ते अहोरात्र सेवा पुरवित असल्याने व्यापर्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे चाळीसगाव आगारातून अत्यअल्प प्रवासी वाहतुक सुरु आहे, महामंडळाने माल वाहतुक सुरु केल्यामुळे चाळीसगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे चाळीसगाव आगार मालवाहतूकीत जिल्ह्यात अव्वल स्थानी आहे. यापुढे देखील व्यापार्‍यांनी एसटीवर विश्‍वास ठेवून आपल्या मालाची सुरक्षित वाहतूक करुन घ्यावी.

संदिप निकम, आगार व्यवस्थापक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com