चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील मुंदखेडे येथील एक शेतकरी विविध आजारासह करोनाग्रस्त होता,

त्याने उपचारासाठी खाजगी सावकराकडून ४ लाख २० हजार रुपये घेतले. त्यांच्यावर उपचार चालू असतांनाच सावकराने, त्याला शासकिय कार्यालयात घेवून जात, तो अर्धवट शुध्दीत असताना, त्यांची सहा एकर शेत जमीन ग्राहन खत करण्याचे खोटे कारण सांगून, खरेदी करुन घेतली. ह्या जमीनीची किम्मत तब्बल 60 लाख रुपये आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंद्रकांत हनुमंत वाबळे,(73) रा.मुंदखेडे, ता.चाळीसगाव यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नूसार त्यांना डायबटीज, हद्यविकार, ब्लडप्रेशर, किडनीचा त्रास व मेंदुमध्ये गाठ असे विविध अजारा आहेत. ते गेल्या 10 महिन्यांपासून जळगाव व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांचा प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना उपचासाठी पैशांची गजर होती, मात्र पैशाअभावी ते उपचार घेवू शकत नसल्याने, तालुक्यातील वाघळी येथील त्यांच्या ओळखीचे सावकार सोपन हरी ढगे यांच्याकडून त्यांनी दोन लाख रुपये मासीक पाच टक्के दराने व्याजाने घेतले.

सोपान ढगे विश्वासातील असल्यामुळे चंद्रकांत वाबळे यांनी कुठल्याही प्रकारची यासंबंधी कागदोपत्री लिखापडी केली नाही. नाशिक येथून चंद्रकांत वाबळे उपचार घेवून घरी आल्यानतंर काही दिवसांनी, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने, पुन्हा त्यांना उपचारासाठी पैशांची गरज पडल्याने त्यांनी सोपान ढगे यांनी फोन केला, त्यावेळे तुझे काही बरे वाईट झाल्यावर आमचे पैसे व व्याज कोण देणार असा, प्रश्न उपस्थित करुन, तुझी जमीन मला स्टम्पवर गहाण ठेवावी लागेल असे सांगीतले. ढगे यांच्या म्हणने नूसार चंदक्रांत वाबळे यांनी जमीन गहाण ठेवण्याचे मान्य केले, व बरा झाल्यावर पैसे देतो असे सांगीतले.

त्यानतंर ढंगे यांनी पैसे दिले. बावळे यांच्यावर नाशिक येथे उपचार चालू असतांना, त्यांना कोरोनाचा लागन झाली. काही दिवसांनतंर उपचार करुन ते घरी आले. घरी आल्यानतंरही त्याच्यावर उपचार चालू असताना, सोपान ढंगे यांच्यासह मुलगा परेश ढगे, त्यांचे व्याही धर्माचंदन व व्याहिन कल्पना धर्माचंदन असे बावळे यांच्या घरी आले. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, तुमच्या जिवाचे बरे झाले तर आमचे पैसे कोण देणार, असे म्हणून बावळे यांना दि,7/7/2020 रोजी तुम्ही आजच मला गहाणखत नोंदवुन द्या असे म्हणून चारचाकी गाडीत बसवून घेवून गेले.

वाबळे यांनी आठ गोळ्या व इजेक्शन घेतलेले असल्यामुळे त्यांना झोप येत होती. आशा परिस्थितीत चाळीसगाव येथे एका कार्यालयात दोन व्यक्तीच्या नावे गहाण खत नोदवायाचे आहे असे सांगून वाबळेे हे शुध्दीत नसतांना स्वाक्षर्या घेतल्या. वाबळे यांनी ढगे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, ऑनलाईन कम्प्युटर वर नोदविल्यानतंर कागद मिळतील असे त्यांनी सांगीतले. त्यानतंर वाबळे यांची शुद्ध जात असताना, त्यानी घरी सोडले. काही दिवासांनतंर गहाण खताची नकल पुतण्यास काढण्यासाठी सांगीतल्यावर त्याने वाबळे यांना खरेदीखाताच्या नकला दाखविल्यानतंर वाबळे व त्यांच्या नातेवाईकाना धक्काच बसला, गहाण खताच्या नावाने ढगे यांनी वाबळेे यांची 60 लाख रुपये किमतीची सहा एकर शेती नावावर करुन घेतल्याचे सजले.

ढगे यांनी केलेल्या खरेदी खतामध्ये शेतातील 600 लिंबुचे झाडे, पाच लाख पाईप लाईन व इतर बाबीचा कुठेही उल्लेख नाही. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला चंद्रकांत बावळे यांच्या फिर्यादीवरुन सोपानि हरी ढगे, परेश सोपान ढगे, दोघे रा.वाघळी, धर्मा चंदन देवळा, कल्पना धर्मा चंदन दोघे, रा.जि.नाशिक. यांच्या विरोधात भादवी कलम 420,465,468,471,34,39 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय महावीर जाधव करीत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी सोपान ढंगे यास अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.