चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

शहरातील हिरापूर चौफुली परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता

सट्टा घेतांना जळगाव एलसीबी च्या पथकाने धाड टाकून अनिल संजय मोरे यास अटक केली आहे.

या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनिल मोरे याच्याकडून तीन हजार 570 रुपये रोख रक्कम व सट्टायाची साहित्य पोलिसांनी जप्त करून शहर पोलीसात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम,पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लोहारे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील,गोरखनाथ बागुल,असरुद्दीन शेख,रामकृष्ण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.