चाळीसगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
जळगाव

चाळीसगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी

दगड, तलवारी, चॉपरचा वापर,स्वीफ्ट कारच्या काचांसह पाण्याच्या टाक्या फोडून नुकसान

Manohar Kandekar

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

शहरातील नागदरोडवर काल चिकन घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला माझ्याकडे रागाने का बघतो? या

कारणावरुन झालेली मारहाण आणि या भांडणाचेच कारण पुढे नेत भावास मारहाण झाल्याचे कारणावरुन काल रात्री नागदरोड वरील भांडणाच्या कुरापती काढून दोन गटात तलवारी, चॉपर आणि लाठ्या काठ्यांचा वापर करीत तुफान हाणामारी झाली.

या दंगलीत एक जण तखमी तर स्वीफ्ट कारच्याही काचांसह पाण्याच्या टाक्या फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील जवळपास २५ ते ३० जणांच्या विरोधात चाळीसगांव शहर पोलीसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एका तक्रारीतील फिर्यादी तसलीम शेख शकिल रा. मजिना मस्जीदजवळ हुडको कॉलनी चाळीसगांव हिचा मुलगा मोनीश हा चिकन घेण्यासाठी नागदरोडवर गेला असतांना त्याठिकाणी हैदर व त्याचे सोबत असलेल्या नऊ जणांनी माझ्याकडे रागाने का पाहतो म्हणून तलवार व चालूने वार करण्यात आले.

यात मोनीश याच्या पाठीवर, छातीवर आणि पायाच्या मांडीवर जखमा झाल्यात. या प्रकरणी पोलीसांत नदीम, सुलतान, हैदर, दानीश, जुबेर, नदीचा भाऊ, मोईन,मायाभाई वाजीद (सर्वांचे पूर्ण नाव माहित नाही) अशांवर गु. र. नं. २७१ भादवि कलम ३२६/१४३/१४७/१४८/१४९/३२३ शस्त्र अधिनियम ४,५ म. पो. अधिनियम ३७८ (१) (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरर्‍या घटनेत फिर्यादीत हैदर अली आसिफ अली रा.पीर सालीम नगर चाळीसगांव याने पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार आपण मोनिश यास नागदरोडवर मारहाण केल्याच्या संशयावरुन काल रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारांस जुबेर शेख उर्फ बंम्बेय्या (पूर्ण नाव माहिती नाही) विकार शेख नुरोद्दीन शेख, अफसरशेख आरीफ शेख, शरीफ उर्फ शफ्या शेख, अकबाज शेख, साहील शेख नुर(वस्ताद), गुज्जरशाह शकील शाह, शोएब उर्फ डिब्बर शेख, जफर शेख, कादर शेख, नसीरशेख, भुराशेख, अशरद उर्फ लल्या शेख, शोएब नुरोद्दीन शेख, अनिसशेख ईसाशेख, सेम शेख, राजू (मुकादम) व इतर पाच ते सहा जणांनी एकत्र येवून तलवारी, लाठ्या रॉडचा वापर करुन माझ्या घरासमोर उभी असलेली स्वीफ्ट कारच्या काचा फोडत बोनट दाबून नुकसान केले.

घरातील लोकांना शिवीगाळ करीत तोडफोड केली.शिवाय घराच्या जवळ राहणार्या आबीदखान अकबरखान याच्या घरासह माझ्या घरावर दगडफेक करीत घरातील लोकांना नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी वरील सर्वांच्या विरोधात गु. र. नं. २७०/२०२० भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९, ४५२, ३२३, ५०४, शस्त्र अधि ४.२५ व म. पो. अधि. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी हालचाली वाढल्या. या प्रकरणी रात्रीच तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास पो. ऊन. नि. आशिष रोही हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com