चाळीसगाव : पातोंडा येथे गावठी हातभट्टी उध्वस्त

८४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला नष्ट
चाळीसगाव : पातोंडा येथे गावठी हातभट्टी उध्वस्त

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील पातोंडा अवैधरित्या सुरु असलेली गावठी दारु तयार करण्याची हातभट्टी चाळीसगाव पोलिसांनी छापा टाकून नष्ट केली आहे.

या कारवाईत एकुण २६२५ लिटर कच्चे रसायन, २०० लिटर पक्के रसायन व ७७० लिटर गा.हा.भ.ची तयार दारु असा एकुण ८४१५० रुपाये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला आहे.

पतोंडा येथे गेल्या अनेक दिवसापासून अवैद्यरित्या दारु तयार करण्याची गावठी हातभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाली.

त्या अनुषंगाने सोमवार(दि,२१) पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल टकले, सपोनि सचिन कापडणीस, पोना पंढरीनाथ दशरथ पवार, पोना विनोद विठ्ठल भोई, पोना शैलेश आत्माराम पाटील, पोना भटु भाऊसाहेब पाटील, पोकॉ अशोक शांताराम मोरे, पोकॉ प्रकाश शिवदास पाटील, पोकॉ विनोद तुकाराम खैरनार, पोकॉ विजय रमेश पाटील, पोकॉ निलेश हिरालाल पाटील, पोकॉ दिपक प्रभाकर पाटील, मपोशि सबा शेख आदिच्या पथकाने पातोंडा येथे छापा टाकला

त्याठिकाणी शेत शिवारात जावुन आरोपी अक्षय भास्कर गायकवाड (भिल), कैलास निंबा वाघ, राहुल उर्फ भोला साहेबराव सोनवणे, सुभाबाई देवराम गायकवाड सर्व रा. पातोंडा ता. चाळीसगांव हे हात भट्टीची दारु तयार करीत असताना मिळुन आले.

त्यांच्या ताब्यातून एकुण २६२५ लिटर कच्चे रसायन, २०० लिटर पक्के रसायन व ७७० लिटर गा.हा.भ.ची तयार दारु असा एकुण ८४१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन, जागीच नाश केला आहे.

याप्रकरणी वरील आरोपीं विरुध्द प्रोव्ही.कायदा कलम ६५ (इ)(उ)(ऊ)(ए)(ऋ) प्रमाणे ०४ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोना विनोद भोई व स फौ धर्मराज पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com