पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल

पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल

एसटीआय ऑफीसर असल्याचे सांगून पत्नीचा विश्‍वाघात

चाळीसगाव - chalsigaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील उंबरखेडे येथील उच्च शिक्षीत विवाहितेला पतीने व सासरच्या मंडळीनी वेळोवेळी शाररीक व मानसिक त्रास दिला. पहिले लग्नाची माहिती लपवत तिच्याशी वेळोवेळी अनैर्सीक कृत्य केले.

पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल
राज्यात १६ दिवसांत ८०७४ कोरोना मृतांची संख्या तफावतींमुळे वाढली

पत्नीने पतीला एकदा मांजरीशी देखील अनैर्सीग कृत्य करतांना पाहिले. तसेच माहेरुन पैसे आनण्यासाठी गाजपाठ केला, तिचा गर्भपात देखील करण्यात आला.

अखेर त्रासाला कंटाळून महिलेने आईसह मेहुणबारे पोलीस स्टेशन गाठले, व पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात गुन्हां दाखल केला आहे.

याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनूसार तालुक्यातील मेहुणबारे येथील २३ वर्षीय उच्च शिक्षीत तरुणीचा विवाह दि,३०/१/२०२१ रोजी मालेगाव येथील एकाशी झाला. पती एसटीआय आधिकारी असल्याचे सांगून लग्न करण्यात आले.

लग्न झाल्यानतंर काही दिवसानी पतीने मोबाईलमध्ये अश्‍लील व्हीडीओ दाखवून पत्नीची इच्छा नसताना देखील तिला बळजबरीने अनैसर्गीक कृत्य करायला भाग पाडत असे, तर सासू तिला अश्‍लील शिवीगाळ करुन पाप लावत होती.

एक दिवशी पती हा एका मांजरीशी अनैर्सीग कृत्य करताना पत्नीला दिसला, परंतू पत्नीच्या पैजणांचा आवाज आल्यानतंर त्याने मांजरीला सोडून दिले. पतीच्या आशा वर्तुणीकाचा पत्नीला जबर मानसिक धक्का बसला व ती रात्रभर झोपू शकली नाही. तरी देखील ती सासरी राहत होती.

पुढे दिला दिवस गेले, परंतू पती व सासूने तिला पाप लावत, बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. पती विकास हा एसटीआय या पदावर नसून असिस्टन(क्लार्क) या पदावर असल्याचे माहिती पडल्यानतंर पतीच्या बदलीसाठी माहेरुन पैस आनण्यास सांगीतले. तसेच वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास सुरुच ठेवला.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती, सासू व नणंद यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com