चाळीसगाव : दरेगाव शिवारातून दोन गायी चोरीस

चाळीसगाव : दरेगाव शिवारातून दोन गायी चोरीस

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील दरेगाव शिवारातून अज्ञाच चोरट्यांनी ४० हजार किंमतीची दोन गायी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांत गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

अरूण गुलाबराव पाटील (५२) रा. दरेगाव यांचे दरेगाव शिवारातील गावठाण भागात वरखेडे रोड लगत गायीसाठी शेड आहे. त्यानी नेहमीप्रमाणे जनावरे बांधलेले असतात, अरूण गुलाबराव पाटील हे शनिवार, २९ रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गुरांना चारापाणी करून झोपण्यासाठी घरी गेले.

३० रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास दुध काढण्यासाठी शेतात आले असता, त्याना एक २० हजारची पांढर्‍या रंगाची गाय व दुसरी २० हजार किंमतीची काळ्या रंगाची जर्सी गाय असे एकूण ४० हजार किंमतीची दोन गायी चोरीला गेल्याचे कळताच अरूण गुलाबराव पाटील यांनी लागलीच मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक अनवर तळवी हे करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा गाय चोर सक्रीय झाले असून पोलिसांचा धाक नसल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com