म्हैस शेतात घुसल्यामुळे एकास जबर मारहाण

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बाप-लेकांविरोधात गुन्हां दाखल
म्हैस शेतात घुसल्यामुळे एकास जबर मारहाण

चाळीसगाव - chalsigaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील मुदखेंडा बु, येथे शेताच्या बांधावर चरत असलेली म्हैस दुसर्‍या शेतात घुसली म्हणून दोघांनी एकास जबर मारहाण केली.

तसेच कुर्‍हाडीच्या दांड्या व काठीने मारुन गंभीर इजा केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बाप-लेकांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

समाधान जालम पाटील रा.मुदखेडा बु. हे आपल्या शेताच्या बांधावर म्हैस चारत असताना, त्यांची म्हैस पंढरीनाथ नथ्थू कुमावत यांच्या शेतात घुसली, याच शुल्लक कारणावरुन दोघांमध्ये बाचा-बाची झाली.

याचे रुपांतर नतंर हाणामारीत झाले. समाधान पाटील यांना पंढरीनाथ व त्यांचा मुलागा आदेश यानी शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच पंढीरनाथ यानी हातातील कुर्‍हाडीच्या दांड्याने त्यांच्या हातावर व गुडघ्यावर मारले, तर आदेश याने हातातील काठीने त्यांच्या पाढीवर मारुन जबर दुखापत केली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरुन पंढरीनाथ नथ्थू कुमावत व आदेश पंढरीनाथ कुमावत यांच्या विरोधात भादवी कलम ३२६,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संपत आहिर करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com