प्रेमविवाह केला म्हणून आई वडिलांनीच केला मुलाचा घात

पत्नीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
प्रेमविवाह केला म्हणून आई वडिलांनीच केला मुलाचा घात

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

आई-वडिलांचा विरोध असतानाही प्रेमविवाह केला म्हणून आई वडिलांनी मुलाला घरात डांबून ठेवून त्याचा खून केल्याची घटना चाळीसगाव येथे घडली आहे, याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत वय 35 वर्षे धंदा घरकाम रा. सदिच्छा नगर, धुळे यांनी व मयत निलेश प्रकाश कुमावत रा. चाळीसगाव, या दोघांनी घरच्यांचा विरोध असतांना दिनांक १२/८/२०१९ रोजी रोकडोबा हनुमान देवस्थान दाभाडी, ता. मालेगाव येथे हिंदू विवाह पद्धतीने लग्न केले होते, या लग्नास निलेशच्या आईवडिलांंचा प्रेम विवाहास स्पष्ट विरोध असल्याच्या कारणावरुन फिर्यादीचे पती निलेश प्रताप कुमावत यास गळा दाबुन मारुन टाकुन, त्याचे प्रेतावर पोस्ट मार्टम न करता अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला.

याप्रकरणी फिर्यादी विजय उर्फ सोनिया निलेश कुमावत यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला वारंवार सांगून देखील त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, चाळीसगांव यांचेकडील क्रिमीनल एम.ए. 599/2020 तसेच म.जा.क्र.392/2021 दिनांक 24/03/2021 अन्वये फौ.प्र.सं.कलम 156 (3) प्रमाणे फिर्यादी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत वय 35 वर्षे धंदा घरकाम रा. सदिच्छा नगर, धुळे यांनी आरोपी सौ. अलका प्रताप कुमावत वय 56 वर्षे प्रताप सहादु कुमावत वय 64 वर्षे दोन्ही रा. कैलास नगर, पांडुरंग निवास, भडगांव रोड, भुषण मंगलकार्यालय रोड, चाळीसगांव यांच्या विरुध्द मा. न्यायालयात फिर्याद दिली कि, फिर्यादी व त्यांचे मयत पती निलेश प्रताप कुमावत यांनी प्रेमविवाह केल्याने मयताचे आई-वडील आरोपीतांना त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध असल्याच्या कारणावरुन फिर्यादीचे पती निलेश प्रताप कुमावत यास गळा दाबुन मारुन टाकुन, त्याचे प्रेतावर पोस्ट मार्टम न करता अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला वगैरे मजकुरच्या फिर्याद वरुन चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं.106/2021 भादवि कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या आदेशान्वये सहा. पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, व पोना/2897 विनोद भोई हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com