चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

शहरातील क्रीश वॉईन्स या मद्यविक्रीच्या दुकानाच्या मागील बाजूने चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडून दुकानातील कॉम्पुटर, डि. व्ही. आर. बॅटरी, इर्न्व्हटरसह लाखो रुपयांचे मद्य, दुकानातील तिजोरीतील रुपये व इतर वस्तू असा एकूण २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रीश वॉईन्स हे देशी-विदेशी मद्यविक्रीचे दुकान काल रात्री दिड वाजेच्या सुमारांस अज्ञात चोरट्यांनी दुकानातील आणि परीसरातील दुकानातील सी.सी.टि.व्ही. कॅमेरे तोडत मागच्या बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

दुकानातील किंमती मद्याचे खोके तसेच वस्तुंबरोबरच, दुकानाचा काल दुपारी ४ वाजेनंतर झालेल्या मद्य विक्रीच्या संपूर्ण गल्लावर चोरट्यांनी डल्ला मारला असून पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी डॉगस्कॉडला पाचारण करण्यात आलेले असल्याचे समजते. मात्र या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे. क्रिश वाईन्स हे मद्यविक्रीचे दुकान नेहमी वर्दळीच्या ठिकाणी आणि मागील गोडावून हे नागरी वसाहतीत असतांना चोरट्यांचे धाडस हे आता पोलीसांसमोर एक आव्हान ठरले आहे.

या गुन्ह्यासंदर्भात वाईन्स मधून मद्यसाठा व रोखड असा एकूण २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनाल दुकान मालक निलेश तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.