चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील तळेगाव शिवरात बंदी असलेल्या बैलांच्या शर्यती(शाम्या गोडा) कार्यक्रमाचे आयोजन करणे तिघांना चांगलेच महागात पडले.

तिघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हां दाखल करण्यात आला. हि घटना दि,३० रोजी घडली असून बैलगाडीसह संशयितांना तांब्यात घेण्यात आले.

तळेगाव शिवरातील खंडेराव महाराज मंदिर परिसरात न्यायालयाकडून बंदी असलेल्या बैलांच्या शर्यत(शाम्या गोडा)चे भैय्या बाळू निकम(३२) रा.तळेगाव, संदिप भिवसींग परदेशी(३०) रा.पाचोरा, भैय्या उत्तम जाधव(३०) रा.पाचोरा यांनी आयोजन केले होते.

परंतू याची माहिती वेळीच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली, त्यांनी तात्काळ तळेगाव येथे धाव घेवून बैलगाडीसह तिघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तिघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.नितीन आमोदकर करीत आहेत.