चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरकर चौकात जुन्या भाडणाच्या कारणावरुन दोन माजी नगरसेवकांमध्ये बाचाबाची होऊन एकाच्या नातेवाईकांने दुसर्याला चाकूने भोसकलेची माहिती प्राप्त झाली आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यात माजी नगरसेवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

हि घटना संकाळी 11 वाजेच्या सुमारास घडल्याने एकच धावपळ उडली. दरम्यान पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अतंरावर दुसर्या अशा प्रकारची घटना घडल्यामुळे शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे सिद्ध होत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी आणि माजी नगरसेविका पती जगदिश महाजन यांच्यात हाणामारीची घटना घडली होती.

त्या घटनेनंतर आज सकाळी 11 वाजता पोलीस कचेरी बाहेरील सावरकर चौकात प्रभाकर चौधरी आणि जगदिश महाजन हे दोन्ही आमने-सामने आले असता, शिवीगाळ करण्याने वादाला सुरुवात झाली.

या वादावादीत एकाने प्रभाकर चौधरी यांच्या पोटावर चाकूने वार केले. यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेवून हल्ला करणार्या तरुणास ताब्यात घेतले.

या घटनेत जगदिश महाजन यांचे देखील डोक्याला मार लागल्याने दोघांना रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रभाकर चौधरी यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले असल्याचे समजते.

या प्रकरणी रात्री उशीरापर्यंन्त कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान पोलीस सटेशनच्या हाकेच्या अंतराव अशी घटना दुसर्या घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.