चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

शहरातील एमजी नगर येथे मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून दोघांवर तलवार व लोखंडी आसारीने हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली.

याप्रकरणी तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे नाव घेतल्याबाबत विचारल्याच्या कारणावरून फिर्यादी वसंत किसन चौधरी रा. चौधरीवाडा यांना संशयित रोहीत दिपक चौधरी याने पकडून ठेवले व तेजस दिपक चौधरी याने हातातील लोखंडी आसारीने वसंत चौधरी यांच्या हाताचे मनगटावर व उजव्या बरगडीजवळ मारहाण केली, तर संशयित दिपक शंकर चौधरी याने हातातील तलवार उलटी करून फिर्यादी वसंत चौधरी याचा चुलत भाऊ युवराज निंबा चौधरी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजुस मारून दुखापत केली.

तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वसंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 326,324,504,506,34 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.