एलएडी बल्ब खरेदीत सव्वादोन लांखाचा अपहार

एलएडी बल्ब खरेदीत सव्वादोन लांखाचा अपहार

सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा, चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.येथील घटना

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील खडकी ब्रु. ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकांनी एलएडी बल्ब (LED bulb) शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून सव्वा दोन लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सरपंचासह ग्रामसेवकावर (Gramsevak) गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

एलएडी बल्ब खरेदीत सव्वादोन लांखाचा अपहार
ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान

तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच मिराबाई आनंदा जाधव, ग्रामसेवक विजय रघुनाथ चौधरी व ग्रामसेवक ईश्वर शांतीलाल भोई आदींनी संगनमताने एलएडी. बल्ब हे शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख ३४ हजार ५२० रूपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

एलएडी बल्ब खरेदीत सव्वादोन लांखाचा अपहार
Video बोरी नदीचे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याव्दारे सोडा - आ.चिमणराव पाटील

सदर एल.ए.डी. बल्बची खरेदी ३ डिसेंबर २०१५ ते ६ नोव्हेंबर २०१७ रोजी दरम्यान केलेली आहेत. याप्रकरणी सहायक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार ( पंचायत समिती चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम ४२०,३४ प्रमाणे शासकीय निधीचा अपहार करून, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com