गाय चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

गाय चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव तालुक्यातुन पशुधन चोरीचे प्रकार वाढले होते त्यामुळे पशुधन मालक व शेतकरी त्रस्त झाले आहेत.

दि 1 मे रोजी रात्री 1-30 वाजता पोलिसांनी गाईसह चोरट्यास रंगेहात कन्नड बायपास वर ताब्यात घेतला असून त्यास चाळीसगाव शहर पोलिसात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने जवळपास सर्व बैल व पशुधन बाजार बंद आहेत, याकाळात मोठ्या प्रमाणात पशुधन चोरीचे प्रकार वाढले आहेत,

सर्वच बाजार बंद असतांना चोरीचे गुरे कुठे जातात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चाळीसगाव येथे काही भुरटे चोर ही गुरे चोरून कत्तलखाण्यात तर घेऊन जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवाय या गुरांची चाळीसगाव येथे कत्तल करून त्यांचे मास मालेगाव, औरंगाबाद येथे पाठवले जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गुरे चोरांच्या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी शेतकरी व पशुधन मालक करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com