चाळीसगाव : त्या दोन खाजगी कोविड रुग्णालयाचा बिलाप्रकरणी खुलासा सादर

रुग्णांकडून बिलाची आकारणीत त्रृटी आढलुन आल्या नाहीत
चाळीसगाव : त्या दोन खाजगी कोविड रुग्णालयाचा बिलाप्रकरणी खुलासा सादर

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत संलग्न असलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर योजनेचा लाभ न देता इतर रुग्णांप्रमाणे बर्‍याच रुग्णाकाकडून बिल आकारल्याप्रकरणी चाळीसगाव येथील दोन खाजगी रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे सांगीतले होते.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत चाळीसगाव येथील दोन रुग्णालयात कोरोनावर उपचार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मी त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतू त्यांचा अहवाल अद्याप मला प्राप्त झालेला नाही आहे. परंतू त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तो कायदेशिररित्या सादर केला असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही.

डॉ. नागोजीारव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

शासनाच्या नियमानुसार आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली असून शासकीय ऑडिटर कडून ऑडिट करून घेतले आहे, यात बिला संदर्भातील कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नाहीत, त्याचा अहवाल देखील जिल्हाधिकारी यांना पाठवलेला आहे . मी गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावात रुग्णसेवा करीत आहे. तसेच यापुढे देखील शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा चालूच राहील

डॉ. संदीप देशमुख, बाबजी हॉस्पिटल चाळीसगाव

या दोन्ही रुग्णालयांनी शासकिय ऑडीट करुन, जिल्हाधिकारी यांना नियामानूसार अहवाल सादर केला आहे, यात त्रृटी आढळुन आल्या नाहीत. तसेच रुग्णांकडून कुठल्याही प्रकारची जादा बिलाची आकारणी न केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोरोना ऑफिसर डॉ. एन. एस. चव्हाण या दोन्ही रुग्णालयांना नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा मागवण्यात आला होता.

या संदर्भात बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकल या रुग्णालयांनी रुग्णांकडून आकरण्यात आलेल्या बिलासंदर्भातील सर्व कागद पत्रे शसानास सादर करुन, शासकिय ऑडीट करुन घेतले. यात कुठल्याही प्रकारच्या त्रृटी आढळुन आल्या नाहीत. त्यांचा अहवाल दोन्ही रुग्णालयांनी जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे. यात रुग्णांकडून कुठल्याही प्रकारच्या जादा बिलाची आकारणी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू अद्याप हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com