कॉग्रेसतर्फे भाजपा सरकार निषेध
कॉग्रेसतर्फे भाजपा सरकार निषेध
जळगाव

चाळीसगाव : कॉग्रेसतर्फे भाजपा सरकारचा निषेध

लोकशाहीचा पायाचा खिळखिळा करण्याचा भाजपाचा प्रयोग

Manohar Kandekar

चाळीसगाव : कॉग्रेसतर्फे भाजपा सरकार निषेध

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष केला म्हणून माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या जयघोष केल्याबद्दल समज दिली व ही घोषणा रेकॉर्ड वरून काढून टाकण्यात येईल येईल, अशा पद्धतीने सुचनाही दिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तमाम महाराष्ट्रीयन व्यक्तीचे मन दुखावले आहे.अशा त्यांच्या या कृतीमुळे महाराष्टाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या वक्तव्याचा, निषेधाचे निवेदन चाळीसगाव कांग्रेसच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, सेवादल अध्यक्ष आर.डी.चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, ऍड वाडीलाल चव्हाण, अँड.संदीप सोनार, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोळे, रमेश शिंपी, प्रदीप देशमुख, मंगेश अग्रवाल, सुनील राजपूत आदी उपस्थित होते. तसेच केंद्रातील मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तेथे हे राजकीय अस्थिरता निर्माण करून, ती सरकारी पाडण्याचा खेळ सुरू केला आहे. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश व आता राजस्थान येथे हा खेळ सुरू केला आहे, अशा प्रकारे देशातील समृद्ध अशा लोकशाहीचा पायाचा खिळखिळा करण्याचा प्रयोग हे भाजपप्रणीत केंद्राचे सरकार करीत आहेत. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तातडीने राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावून तेथे बहुमत चाचणी घ्यावी. अशी मागणी चाळीसगाव तालुका व शहर कॉंग्रेस, व सेवादलाच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com