चाळीसगाव : कृषी कायदा विरोधात कॉग्रेसचे आंदोलन

चाळीसगाव : कृषी कायदा विरोधात कॉग्रेसचे आंदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

केंद्र सरकारने (Central Government) कृषी धोरणाच्या (Agricultural Policy) विरोधात पारीत केलेले काळे कृषी कायदे (Black agricultural laws) त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी चालवलेल्या शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाने (All India Congress Party) भारत बंदचे (India closed) आयोजन केले. या बंदसाठी चाळीसगाव तालुका महिला कॉंग्रेस (Women's Congress), तालुका कॉंग्रेस व सेवादल तर्फे कचेरी चौकात सोमवारी(दि,२७) रस्ता रोको आंदोलन (Road block movement) करण्यात आले. यावेळी शेतकरी विरोधी काळा कायदा त्वरित मागे घ्यावे या आशयाचे निवेदन चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे (Tehsildar Amol More) यांना देण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्षा सौ सुवर्णा पोळ, तालुका अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव,अलताफ खान जमशेर खान, प्रदिप देशमुख, प्रा.एम एम पाटील, आर जे पाटील, धनंजय चव्हाण,नितीन पाटील, शिवलाल साबणे सुमनबाई मोची अजय पोलडीया, देविदास खरटमल, बापू चौधरी, लताबाई पगारे, लताबाई वाणी, मंदाताई सूर्यवंशी, सुमनबाई मोची, पुजा मोची, सुमनबाई नंगवारे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.