चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातून जाणारा बोढरे-धुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम माजी खासदार ऐ.टी.पाटील यांच्या पाठपुराव्या त्यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये मंजूर झाले होते.

त्यावेळेस ए.टी.पाटील यांनी पाठपुराव करुन तात्काळ निविदा काढून ठेकेदाराला काम देखील दिले होते. तसेच केद्रिंय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळे ते औरंंगाबाद या महामार्गाचे धुळ्यात (दि,५ नोव्हेबर २०१६) उद्घाटन देखील केले होते. परंतू ठेकेदाराने आर्थिक कारण दाखवत ते काम केलेच नाही. त्यामुळे आता फक्त नव्याने निविदा मंजूर करुन, संबंधीत ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतू एकाच कामाची अनेकदा प्रसिद्धी मिळवून स्वता;ची पाठ स्वता;च्या हाताने थोपटून घेण्यासाठी विद्यामान खासदार उन्मेष पाटील हे नेहमीच प्रयत्नशिल असल्याची चर्चा आता चाळीसगावात रंगू लागल्या आहेत.

महामार्गाच काम तब्बल तीन वर्ष ठप्प

सन २०१६ मध्ये माजी खासदार ऐ.टी.पाटील यांच्या पाठपुरव्यामुळेे हा केद्रांचा महत्वपूर्ण महामार्गाचेे चौपदरीकरणाचे मंजूर झाला होते. त्यावेळेस निविदा निघून काम देखील ठेकेदाराला देण्यात आले होते.

परंतू पुढे ठेकेदाराने आर्थिक कारण दाखवून महामार्गाच्या कामच केले नाही. पुढे २०१७,२०१८,२०१९ महामार्गाच्या काम ठप्प होते. लोकसभेच्या निवडणुका व लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे हे काम ठप्प असल्याची चर्चा आहे. दुसर्यांदा निविदा काढण्यात तब्बल तीन वर्षांचा कालवधी गेला.

तोपर्यंत या रस्त्यावरील खड्यांमुळे अनेकांचे जीव गेलेत, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरण्याचे काम ज्याच्यामुळे रखडले असे आधिकारी व लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल का करण्यात येवून नये असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खासदार साहेब एकाच कामाची कितीदा प्रसिध्दी घेणार ?

बोढरे-धुळे चौपदरीकरण महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम माजी खासदार ऐ.टी.पाटील यांच्या पाठपुराव्या त्यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये मंजूर झाले होते. सन २०१७-०१८ माजी खासदार ऐ.टी.पाटील व तात्कालीन आमदार तथा विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांनी संयुक्तरित्या परिषद घेवून, जळगाव ते चांदवड महामार्ग व बोढरे-धुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली होती.

तसेच केंद्र शासनाच्या योजनेतून तालुक्यातील बहाळ ते उपखेड, सेवानगर पर्यंतच्या प्रमुख मार्गासाठी १३ कोटी रुपयेचा निधीची तरदूत करण्यात आल्याची माहिती दिली होती. तसेच चाळीसगाव ते कन्नड घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा होणार असून दळणवळण झटपट होणार असल्याचे सांगीतले होते.

परंतू अजूनही कन्नड घाटातून बोगदा झाला नाही. तो फक्त सर्व्हेशनाच्या चक्रव्युहात हटकला आहे. तर बोढरे-धुळे चौपदरीकरणाबाबत पुन्हा-पुन्हा जुनी कॅसेट वाजवून विद्यामान खासदार स्वता;ला प्रसिद्धीच्या झोकात ठेवून, स्वता;च्या हाताने स्वता;ची पाठ थोपटून घेत असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगत आहेत. त्यामुळे एकाच कामाची कितीदा प्रसिद्धी मिळवूण घेणार असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. आज घडली शहरासह तालुक्यात अनेक प्रश्न ‘ आ ’ वासून उभे आहेत. परंतू विद्यामान खासदारांचा दिल्ली वारीत व आमदारकीच्या काळात केलेल्या कामांची पुन्हा-पुन्हा पाहणी करण्यातच जास्त वेळ जात असल्याचे आता जनतेतून बोलले जावू लागले आहे.

कन्नड घाटातील बोगदा व बोढरे-धुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत चाळीसगावची जनता वारंवार ऐकून आता कंटाळली आहे. तसेच तेच ते मुद्दे उपस्थित करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. तसेच बायपासवरील टोल वसुली देखील बेकायदेशीर असून त्याची चौकशी केली गेली पाहिजे.-
दिनेश पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी

माजी खासदार चंद्रकांत खैरे व ए.टी.पाटील यांच्या कार्यकाळात महामार्ग क्र. २११ च्या चौपदरी करण्याची कामे मंजुर झाली आहेत. परंतू पुन्हा पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करुन, विद्यामान खासदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. चाळीसगावच्या जनतेला सर्व काही माहिती आहे. -
प्रा.गौतम निकम, जनआदोलन खान्देश विभाग