चाळीसगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करताना सापडला अस्थीकलश

डॉ.बाबासाहेब यांच्या अस्थींचा कलश असल्याचा दावा
चाळीसगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करताना सापडला अस्थीकलश

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरात नदीकिनारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे सुभोभीकरण सुरु असताना, आज त्याखाली पुरातन दोन अस्थीकलश सापडले, हे अस्थीकलश डॉ.बाबासाहेब यांचा पुतळा स्थापन झाळा त्या दरम्यानचा १४ एप्रिल १९६१ च्या असून त्यातील एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतू याला कुठल्याही पद्धतीचा लिखीत पुराव अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही.

प्रभाग क्र.१३ मध्ये नगरसेवीका तथा आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब उद्यान व पुतळ्याचे सशोभीकरण सध्या करण्यात येत आहे. आज खोदकाम दरम्यान डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याच्या खाली दोन ताब्याचे कळश मिळून आला. ते कलश सन १९६१ मध्ये ज्यावेळेस पुतळ्याची स्थापना झाली, त्यावेळचे असल्याचे सांगण्यात येत असून त्यातील एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतू या अज्ञाप पर्यंत कुठल्याही पद्धतीची याला पुष्ठी मिळाली नाही. चाळीसगाव येथील डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे १४ एप्रिल १९६१ साली दिवान सिताराम चव्हाण(बापूजी) माजी मंत्री डी.डी.चव्हाण (Former Minister DD Chavan) यांचे वडील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.

दरम्यान डॉ.बाबासाहेब यांच्या अस्थीकलश चाळीसगाव त्याकाळात कामाजी जाधव यांनी आनला असल्याची माहिती रोशन जाधव यांन दिली. आज मिळालेला हस्तीकलश तोच आहे, असा कुठल्याही पद्धतीचा पुराव अज्ञाप मिळाला नाही. मात्र पूर्वी डॉ.बाबासाहेब यांचा स्थापन करण्यानी सांगीतले होते की, याठिकाणी आम्ही अस्थीकलश ठेवलेला आहे. आढळलेल्या अस्थिकलशाची नवीन जागी विधीवत पुर्नस्थापना करण्यात येणार आहे. पालिकेच्या उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, मुख्य अभियंता विजय पाटील यांनी पंचनामा केला. यावेळी आरोग्य सभापती सायली जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, अरुण अहिरे, रोशन जाधव, गौतम जाधव, बबलू जाधव आदि उपस्थित होते. अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली. पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास १० फूट खाली कॉंक्रीट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असलेले २ अस्थीकलश मिळून आले. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले ९ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व १० डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणल्याचे सांगण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com