चाळीसगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दर्गा परिसरात पाच महिन्यापूर्वीची घटना, मुलगी गरोदर राहिल्याने फुटली वाचा
चाळीसगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
pune crime

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरात आपल्या आईसोबत फुगे विकण्यासाठी आलेली अल्पवयीन मुलगी दर्गा परीसरात आईसोबत झोपलेली असतांना, मध्यरात्री तिला दोन जणांनी धाक दाखवत तेथून काही अंतरावर नेत तिच्यावर हात आणि तोंड दाबून अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. जळगाव येथे एका चोरीच्या गुन्ह्यात सदर अल्पवयीन मुलगी ही पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होत. दरम्यान ती गरोदर समजल्याने, हि घटना गेल्या पाच पहिन्यांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल झाला आहे.

शहरातील बामोशी बाबा दर्गा परिसरात अल्पवयीन तरुणी ही तिच्या आई सोबत गेल्या पाच महिन्यांपूर्वी चाळीसगांवात फुगे विकण्यासाठी आलेली होती. फुगे विकतांना उशिर झाला, म्हणून रात्री शहरातील दर्गा परीसरात ती आईसोबत झोपलेली असतांना, मध्यरात्री दोन अनोळखी इसम दाढी आणि गुडघ्यापर्यंन्त सदरा असलेले आले, आणि त्यांनी सदर तरुणीला ‘ तु आमच्या सोबत मुकाट्याने चल, तु आमच्यासोबत आली नाही, तर तुझ्या आईला चाकुने ठार मारु अशी धमकी देत तिला तेथून लांब नेत, एकाने तिचे हात दाबून आणि आरडा ओरड करु नये, म्हणून तोंड दाबून धरत तिचेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाच महिन्यांपूर्वी हि घटना घडली होती.

त्यानतंर जळगाव येथे एका चोरीच्या गुन्ह्यात सदर तरुणी सापडली आणि ती अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात तिला ठेवण्यात आल्यानंतर, दरम्यान ती बालसुधारगृहात गरोदर आढळून आल्याने, पाच महिन्यापूर्वी घडलेल्या कृत्याला वाचा फुटली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा प्रकार बालसुधार गृहातील अधिकारी कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर सदर तरुणीनेे आपल्यावर चाळीसगावात दर्गा परीसरात घडलेल्या आपबीतीचे कथन केल्यानंतर बालकल्याण समिती जळगांव यांनी सदर तरुणीचा जबाबानुसार चाळीसगांव शहर पोलीसांत तक्रार देत दोन अज्ञात दाढीवाल्यांवर गु. र. नं. २५/२०२१ कलम ३७६ (डी), ५०६, ३४ सह बालकांचे लैंगीक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा कलम ४, ८, १० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून दर्गा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनत चालल असून पोलिसांकडून ठोस कारवाईची मागणी केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com