देवळी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत
देवळी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील देवळी ग्रामपंचायततर्फे आज(दि,२५) ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण चाळीसगाव पंचायत समितीचे सभापती अजय पाटीले व उपसभापती भाऊसाहेब पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री वाळेकर साहेब, विस्तार आधिकारी, सर्व आजी माजी सदस्य,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. देवळी ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथमच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन आदर्श निर्माण केला आहे

त्यामुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचयातीने देखील त्यांचा आदर्श घेवून आशाच प्रकारच्या आरोग्य विषयी सुविधा निर्माण करुन द्यावेत असे मत यावेळी सभापती अजय पाटील यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com