चाळीसगावला पुन्हा पुराचा वेढा, पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान

३३ पशुधन, २३३ घरांना बांधा, डोंगरी व तितुर नद्यांना महापुर
चाळीसगावला पुन्हा पुराचा वेढा, पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे शहरातून वाहनार्‍या तितुर व डोगरी नदीला पुन्हा पुर आल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शहरातील काही भागात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुरामुळे तालुक्यातील नांद्रे, पिंपळवाढ निकुंभ, रोहिणी, करजगाव, राजदेहरे यांच्यासह अनेक गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे, अनेक गावांमध्ये व शेतांमध्ये पाणी शिरल्याने, तब्बत ५३०० हेक्टर शेतीचे नूकसान झाले आहे. तर ३३ पशुधन व २३३ घरांना बांधा पोहचली असल्याची माहिती मिळाली आहे.

डोगरी व तितूर नदींच्या Titur and Dongari rivers पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी संकाळी शहरात बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात पाणी शिरले होते. तर रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा नदीच्या पाण्यात वाढत झाली व पाणी थेट शहराच्या मुख्य बाजारपेठेत शिरले. शहराला जोडणारे दोन्ही पुल पाण्याखाली गेल्याने रात्रीपासून जुने व नव्या गावांचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील नांद्रे, पिंपळवाढ निकुंभ, रोहिणी, करजगाव, राजदेहरे यागावासह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.

तालुक्यातील मन्याड धरण Manyad Dam पूर्ण क्षमतेने भरले असून मागील पंधरवड्यापासून त्यामधून पाणी सोडले जात आहे. काल रात्री मन्याड धरणाच्या Manyad Dam वरील बाजूस ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून एक हजार क्युसेस पेक्षा जास्त पाणी वाहत आहे. हे पाणी गिरणा नदीत आले आहे. त्यामुळे गिरणा नदी देखील दुथडी वाहत आहे. तर तालुक्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प भरले आहेत. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यातील नदी काठावरील गावांना प्रशासनातर्फे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुरामुळेे पुन्हा तालुक्याते नूकसान-

डोगरी व तितुर नदीला Titur and Dongarki rivers नुकताच पुर येवून गेल्याने, शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी गावांना पुराचा चांगलाच फटका बसला होता. यात शेकडो जनावरे व पशुधनाचे नूकसान झाले होते. पहिल्या पुराच्या या जखमा ताज्या असताना काल रात्री पुन्हा डोंगरी व तितूर नदीला महापुर आल्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांचे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नूकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५३०० हेक्टर शेती पाण्याखाली येवून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तर ३३ पशुधन व २३३ घरांचे नूकसान झाले आहे. सतत धार पावसामुळे तालुक्यात लागोपाठ दोन पुर आल्यामुळे तालुक्यात मोेठे आर्थिक नूकसान झाले आहे.

पंचनामे होऊन मदत नाहीच, आता दुसरे पंचनामे करण्याची वेळ आली-

तितूर व डोंगर नदीला Titur and Dongari rivers ३१ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त ६४ गावांचे शासकिय पंचनामे शनिवारी पूर्ण झाले आहेत. यात १६५१ घरांचे व ३७६१ जनावरे व पक्षांचे नूकसान झाल्याचा अहवाल येथील महसूल प्रशासनातर्फे शासनास देण्यात आला आहे. पहिल्या पुरामुळे पंचनामे झालेल्याना अद्याप मदत मिळालेली नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नूकसानग्रस्त भागाची पाहणी करुन गेले, या दौर्‍यात त्यांनी पंचनामे झाल्याबरोबरच तातडीच शासकिय मदत देवू असे सांगीतले होते. पंचनामे पूर्ण होऊन आज पाच ते सहा दिवस झाले. तरी देखील पुरग्रस्तांना कुठल्याही प्रकारची शासकिय मदत मिळालेली नाही. तोच काल(दि,८) रात्री पुन्हा शहरासह तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळाख्यात सापडली. यात तब्बल ५३०० हेक्टर शेती पाण्याखाली येवून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तर ३३ पशुधन व २३३ घरांनाचे नूकसान झाले आहे. आता शासनाला पुन्हा दुसर्‍यांदा पंचनामे करण्याची वेळ आली, तरी देखील शासकिय मदत मिळत नसल्याने पुरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

कन्नड घाटात दरड कोसळणे सुरुच-

डोंगर भागात अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात Kannada Ghat दरड कोसळुन मोठे नूकसान झाले आहे. घाटाताली रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे, परंतू सतत धार पावसामुळे दररोज कन्नड घाटात दरड कोसळत आहे. काल देखील रात्री पावसामुळे घाटात ठिक-ठिकाणी दरड व झाडे पडलेली आहेत. ते बाजूला करण्याचे काम राज पून्शी व त्यांची टिम करीत आहेत.

तालुक्याची पर्जन्यमान स्थिती-

चाळीसगांव-३० मि.मी., बहाळ-३३ मि.मी., मेहुणबारे-२५ मि.मी., हातले - २५ मि.मी., तळेगांव-१०६ मि.मी., शिरसगांव-७० मि.मी., खडकी-५५ मि.मी., पर्जन्यमान-३४४, सरासरी पर्जन्यमान-४९.१४, प्रोग्रेसीव्ह पर्जन्यमान-८९०.२० मि.मी.

आ.मंगेश चव्हाण यांच्याकडून पाहणी-

तालुक्यात पुन्हा रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नांद्रे, पिंपळवाढ निकुंभ, रोहिणी, करजगाव, राजदेहरे आदी गावांची आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांच्यासह पाहणी केली. यावेळी आ.चव्हाण यांनी तात्काळ पंचनामे करुन, शसाकिय मदतीबाबतच्या सूचना आधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com