बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊ दोघांचा मृत्यू

तालुक्यातील सायगाव येथील घटना
बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊ दोघांचा मृत्यू

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

शेतातून काम करून घराकडे येत असताना, बैलांना पाणी पाजण्यासाठी तालुक्यातील सायगाव येथील नाल्यात जात गेले, असता त्याठिकाणी बैलगाडी उलटून दोन अल्पवयीन तरुणाचा पाण्यात बडून मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील सायगाव येथील राकेश चिला अहिरे (19 ) हा पिलखोड येथे आय टी आय शिकत आहे, तो आई वडिलांना एकुलता एक असून वडील अंध आहेत. तर दुसरा सुकदेव जगन जाधव (१७) हे दोघे आतेभाऊ मामेभाऊ दि ८ जुलै रोजी शेतात गेले होते, शेतातून घराकडे सायगाव येथे बैलगाडी वर येत असताना, सायगाव शिवारातील रस्त्यावर असलेल्यानाला येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी बंधार्‍यावरून जात असताना, बैलगाडी पलटी होऊन पाण्यात दोघांच्या अंगावर बैलगाडी पडल्याने गाडीखाली दाबून जखमी झाले.

बाजूलाच मेंढपाळ लोक होते त्यांनी पाहिले असता ते धावत आले त्यांनी आरडाओरडा करून लोक जमा झाले त्यांना जखमी अवस्थेत चाळीसगाव येथे रुग्णालयात आणतांना रस्त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशना नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com