video चाळीसगाव : दैव बलवत्तर होते म्हणून वाचले प्राण

कन्नड घाटात ट्रकचे ब्रेक फेल, म्हसोबा येथील पत्री शेडचे नूकसान
video चाळीसगाव : दैव बलवत्तर होते म्हणून वाचले प्राण

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात आज एका ट्रकचे ब्रेक अचानक फैल झाल्याने, ट्रक म्हसोबा देवस्थानच्या शेडला जावून धडकला.

यात म्हसोबा देवस्थानच्या पत्री शेडेचे मोठे नूकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवत हानी झाली नाही. ट्रक चालकाचे देव बलोत्तर होते म्हणून ट्रक चालकाचे आज प्राण वाचल्याची चर्चा मात्र दिवसभर होती.

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर ट्रक(क्र.पीआय,जीएफ.०६८३) चाळीसगावकडे येत असताना, अचानक ट्रकचे ब्रेक फैल झाले.

त्यामुळे चालकांना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या व हजारो भक्तांचे श्रध्दा असलेल्या म्हसोबा देवस्थानच्या पत्री शेडला जावून धडकला, यात पत्री शेडचे मोठ्या प्राणात नूकसान झाले.

परंतू सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. म्हसोब देवस्थान जर नसते, तर आज ट्रक खोल दरीत जावून पडला असता. आणि ट्रक चालकाचे व इतरांचे प्राण गेले असते.

परंतू म्हणतात ना, देव तारी तेला कोण मारी. आज ट्रक चालकाचे दैव बलवत्तर होते, म्हणून ट्रक चालकाचे प्राण वाचले आहे. म्हसोबा देवस्थान हे कन्नड घाटत स्थापन झाल्यापासून आस्थित्वात असून घाटातून जाणारे वाहन चालक म्हसोबाचे दर्शन व नारळ फोडल्याशिवाय पुढे जात नाही.

या देवस्थानाचे विशेष महत्व असल्याचे सांगण्यात येत असून भक्तांच्या हाकेला नेहमीच म्हसोबा धावून जातो आज याचा प्रत्यय पुन्हा आल्याची चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com