ट्रॅक्टर व कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ट्रॅक्टर व कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
file photo

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव-धुळे रस्त्यावर भोरस ते मेहूणबारे दरम्यान पुढे चालणार्‍या ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या मागून येणारी टाटा मांझा कार ट्रॅक्टरला धडकली.

या अपघातात कारमधील ३६ वर्षीय महिला जागीच ठार झाली. माधुरी नितीन चव्हाण असे मयत महिलेचे नाव आहे.चाळीसगाव- धुळे रोडवर भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी टाटा माझा कंपनीच्या गाडीचा (क्र. एम.एच.२३-ड्ब्लू ००८७) जोरदार धडक लागला.

या अपघातात माधुरी नितीन चव्हाण रा. सप्तश्रृगी नगर, भडगाव रोड या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पती नितीन सुरेश चव्हाण (४५) हे जखमी झाले आहे.

ही घटना मंगळवार, २५ रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास अमृत जिनिंग ते भोरस फाट्याजवळ घडली. घटना घडताच अज्ञात ट्रॅक्टर चालक हा पसार झाला.

या प्रकरणी नितीन सुरेश चव्हाण याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादवी कलम- ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ व मोटार वाहन अधिनियम १३४ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com