कार झाडावर धडकल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव

कार झाडावर धडकल्याने तरुणाचा मृत्यू

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील मेहुणबारे गावाच्या पुढे जामदा फाट्याजवळ भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून चालकाचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

हि घटना दि,१८ रोजी संकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. संकेत बाबराव मुंडे रा.मुर्तीजापुर, जि.अकोला असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हांची नोंद करण्यात आली आहे.

मयत संकेत बाबराव मुंडे(२४) रा.मुर्तीजापुर,जि.अकोला व किरण संभाजी वराळे(२६) रा.देवपुर धुळे, हे दोघे इंडिय ऑईल कंपनीच्या कामानिमित्ताने धुळे येथून औरंगाबादकडे होन्डा ऍमेन(एमएच ३०,एझेड ९४२०) या चारचाकी काराने भरधाव जात असताना, धुळे चाळीसगाव रोडवर मेहुणबारे गावाच्या पुढे जामदा फाट्याजवळ संकेत यांचा कारवरील धाबा सुडल्याने, ती थेट झाडावर जावून धडकली, यात संकेत याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण संभाजी वराळे हा जखमी झाला.

घटनास्थळी आजुबाजूच्यानी धाव घेतली व दोघांनाही कारच्या बाहेर काढले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपो.जालमसिंग पाटील करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com