चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरासह परिसरातून गेल्या महिनाभरापासून विविध भागात मोटारसायकली चोरीच्या घटना घडत असून गेल्या चोवीस तासातच शहरातून जवळपास चार ते पाच मोटारसायकली चोरुन नेल्याच्या घटनेने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परंतू अजुनही चाळीसगाव पोलिसांकडून ठोस करवाई करण्यात आली नसून एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. शहरातून पोलिसांच्या धाक नसल्याने, चाळीसगाव शहरात मोटारसायंकल चोरट्यांची टोळी आल्याची चर्चा सुरु आहेत.

शहरातील पाटीदार मंगल कार्यालय, तेली समाज मंगल कार्यालयाबाहेरुन, पोलिस मैदानासमोरुन आणि बाराभाई मोहल्ला अशा चार वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरात घरफोडी, वाहने चोरीसह धूमस्टाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गणेश कॉम्प्लेक्समधून गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. या व्यापारी संकुलांमध्ये बहूताश दुकानदारंाकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र ते निव्वळ शोपीस ठरले आहेत. एखादे वाहन चोरीची घटना घडली तर सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या दुकानांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणीबाबत सहकार्य मिळत नाही.

शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले होते. परंतू ते आता बंद स्थिती आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ते बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी संकुलांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या व्यापारी संकुलांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. वाढत्या चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्यात काही अंशी मदतही होत आहेत. मात्र तरीही बर्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कधी बंद तर कधी चालू यामुळे शोपीस ठरत आहेत. शहरातील प्रमुख व्यापारी संकूल असलेल्या गणेश कॉम्पले्नसमध्ये मोबाईल विक्रीसह इतर दुकाने आहेत. त्यामुळे दिवसभर या संकुलात ग्राहकांची वर्दळ असते. वस्तु खरेदी करण्याच्या निमीत्ताने अनेक ग्राहक आपली दुचाकी बाहेर मोकळ्या जागेत लावतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून या गणेश व्यापारी संकुलातून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत चाळीसगाव पोलीसात चोरीचे गुन्हेही दाखल झाले आहेत. वाढत्या चोर्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असतांना मोजक्या दुकानांकडे हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. काही दुकानदारांचे सीसीटीव्ही कॅमेरे निव्वळ शोपीस ठरले आहेत. केवळ गणेश व्यापारी संकुलच नव्हे तर इतर व्यापारी संकुलांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे शोपीस ठरू लागले आहेत.ज्यावेळेस चोर्या होतात त्यावेळेसच नेमके दुकानांबाहेरील कॅमेरे बंद असतात त्यामुळे चोरट्यांचा माग घेता येवू शकत नाही. तर चाळीसगाव पोलिसांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे आड लपून चालणार नाही. चाळीसगाव पोलिसांचा शहरात धाक नसल्यानेच मोटारसायंक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केवळ सीसीटिव्ही कॅमेरच्या आड लपून पोलिसांनी चालणार नाही. पूर्वी चाळीसगाव पोलिसांकडे भक्कम सोर्स होते, त्यामुळे चोरट्यांच्या मुसक्या आवळता येत होत्या. परंतू आता चाळीसगावात बरेच नवीन पोलीस कर्मचारी रुजू झाले असून त्यांचेकडे सोर्सचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता शहर पोलीसांची तीन पथके तैनात करण्यात आली असून शहरातील कॉम्पलेक्स, मंगलकार्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्ही. कॅमेरे बसवण्नयाच्या सुचना देखील आज व्यापारी आणि मंगल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

पो. नि. विजयकुमार ठाकुरवाड,चाळीसगाव